पुलगाव कडकडीत बंद

By Admin | Updated: May 13, 2015 01:49 IST2015-05-13T01:49:31+5:302015-05-13T01:49:31+5:30

स्थानिक पालिकेच्या क्रीडा संकुलासाठी आरक्षित व शहरातील एकमात्र मैदान म्हणून सर्कस ग्राऊंडचे नाव आहे;

Pulgaon sticks in the stew | पुलगाव कडकडीत बंद

पुलगाव कडकडीत बंद

पुलगाव :  पण यातील काही जागा एका संस्थेला दिल्याने शहरात असंतोष पसरला आहे़ यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले होते़ या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला़ कधी नव्हे ते दिवसभर शहरातील सर्व प्रतिष्ठाणे, दुकानांसह पानठेलेही बंद होते़
शहरातील मोठ्या सभा, कार्यक्रम, सर्कस, मीना बाजार आदींसाठी हे मैदान वापरले जाते; पण शासनाच्या महसूल विभागाने सदर मैदान एका खासगी शिक्षण संस्थेला दिल्याने वातावरण तापत आहे. याबाबत रविवारी सर्वपक्षीय सभा झाली. यात महसूल विभागाच्या निर्णयाचा फेरविचार करावा व क्रीडा संकुलासाठी सदर मैदान मोकळे करावे, अशी मागणी करण्यात आली़ ही मागणी शासन दरबारी रेटण्याकरिता पुलगाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यामुळे शहरातील बाजारपेठ मंगळवारी सकाळपासूनच बंद होती़ शहरात कधी नव्हे असा कडकडीत बंद पाळण्यात आल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र होते़ सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने मोर्चा काढून नायब तहसीलदार एम़एम़ गायकवाड यांना निवेदनही सादर केले. सदर खासगी संस्थेला पालिकेची दुसरी जागा देण्यात यावी, सर्कस ग्राऊंड कुणालाही देऊ नये, सदर जागा क्रीडा संकूलासाठी आरक्षित असून तेथे संकूलाची निर्मिती करावी, अशी मागणी रेटून धरण्यात आली़ निवेदन देताना गिरीष चौधरी, ओंकार धांदे, ओमप्रकाश पनपालिया, श्यामसुंदर देशमुख, अशोक म्हात्रे, गौतम गजभिये, बाळू शहागडकर यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी)
आंदोलन शांततेत
शहरातील बाजारपेठ सकाळपासून बंद होती़ कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही़ दुकानदार व किरकोळ विके्रत्यांनीही सहकार्य केल्याने बंद शांततेत पार पडला़
आॅटोही बंद
या बंद दरम्यान शहरातील आॅटो चालकांनीही आपला सहभाग नोंदविला. त्यांनी दिवसभर आॅटो बंद ठेवले.

Web Title: Pulgaon sticks in the stew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.