साथीच्या रोगाने पुलगाववासी त्रस्त
By Admin | Updated: August 24, 2014 23:42 IST2014-08-24T23:42:11+5:302014-08-24T23:42:11+5:30
महिनाभरापासून दिसेनासा झालेला पाऊस, ३६ अंशापर्यंत गेलेले तापमान व दिवसभर चालणारा कायमचा उकाडा यामुळे शहर व ग्रामीण भागात टायफाईट, गॅस्टो, डायरिया या साथीच्या रोगांचे

साथीच्या रोगाने पुलगाववासी त्रस्त
पुलगाव : महिनाभरापासून दिसेनासा झालेला पाऊस, ३६ अंशापर्यंत गेलेले तापमान व दिवसभर चालणारा कायमचा उकाडा यामुळे शहर व ग्रामीण भागात टायफाईट, गॅस्टो, डायरिया या साथीच्या रोगांचे आगमन झाले असून ताप सर्दी, खोकला या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. या सर्व परिस्थितीमुळे पुलगाववासी त्रस्त झाले आहे.
संपूर्ण तालुक्यात संसर्गजन्य आजारांनी थैमान घाातले आहे़ या साथीच्या आजाराने तालुक्यातील नागरिक बेजार असून ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचा बाह्य रूग्ण विभाग दररोज सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत हारूसफुल असतो. तर शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकाच्या दवाखान्यातही रूग्णांची गर्दी वाढली असल्याचे दिसून येत आहे. देवळी तालुक्यात पुलगाव भिडी देवळी येथे ग्रामीण रूग्णालये तर नाचणगाव, विजयगोपाल, गौळ, गिरोली, देवळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अशा आठ आरोग्य संस्था व प्रत्येक आरोग्य केंद्रांतर्गत येणारी उपकेंद्रे असा भलामोठा फौजफाटा रूग्णांच्या सेवेकरिता तैनात केला आहे. या सर्व रूग्णालयात सध्या संसर्गजन्य आजाराने ग्रासलेल्या रुग्णांव्यतिरिक्त इतरही रूग्णांची गर्दी वाढली आहे़ प्रत्येक आरोग्य केंद्रातील बाह्यरूग्ण विभागात दररोज १५०-२०० रूग्ण उपचारासाठी येत असून यापैकी बहुतांश रूग्ण थंडी, ताप, सर्दी, पडसा, खोकला या लक्षणांनी तर काही डायरिया, गॅस्ट्रो, टायफाईड व इतर साथीच्या आजारांनी ग्रासले आहे.
चिठ्ठीमुक्त योजनेचा प्रचार करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व शासकीय ग्रामीण रूग्णालयात बरेचदा जीवनरक्षक औषधाचा तुडवडा असतो़ त्यामुळे बऱ्याच रूग्णांना खाजगी व महागड्या औषधोपचार घावे लागतात. अधिकाऱ्यांच्या दोन-दोन जागा तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर असूनही काही आरोग्य केंद्रात केवळ एक तर काही केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेला एकच वैद्यकीय अधिकारी प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहतो़ प्रत्येक आरोग्य केंद्रात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले. पण या कक्षासाठी तैनात करण्यात आलेला कर्मचारी वर्ग रात्रपाळीला उपस्थित राहत नसल्याची ओरड नागरिक करीत आहे़
तालुक्यातील पुलगावसह इतर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह असंसर्गजन्य आजार नियंत्रण अधिकारी, साथरोग नियंत्रण महिला वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, नेत्रतज्ज्ञ, अॅलोपॅथी, होमिओपॅथी, युनानी आयुष आयुर्वेद असे वैद्यकीय अधिकारी असा १०-१२ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ताफा तैनात असतो. पण त्यापैकी मुख्यालयी किती राहतात हा प्रश्न आहे. अनेकांनी आपले खाजगी व्यवसाय थाटले आहे. या सर्व बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ दुषित पाणी पुरवठा, उघडयावर होणारी खाद्य पदार्थाची विक्री रसायनाने पिकविलेल्या भाज्या याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे़(तालुका प्रतिनिधी)