सार्वजनिक बांधकाम विभागाला रिक्त पदांचे ग्रहण
By Admin | Updated: October 14, 2016 02:41 IST2016-10-14T02:41:10+5:302016-10-14T02:41:10+5:30
उपविभाग म्हणून तीन तालुक्यांचा कार्यभार सांभाळणाऱ्या आर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला गत दोन वर्षांपासून रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला रिक्त पदांचे ग्रहण
आर्वी उपविभागात ११ पदे रिक्त : गरज २१ अभियत्यांची
आर्वी : उपविभाग म्हणून तीन तालुक्यांचा कार्यभार सांभाळणाऱ्या आर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला गत दोन वर्षांपासून रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. या उपविभागात २१ अभियंत्यांची गरज असताना येथे केवळ १० अभियंते कार्यरत आहे. या उपविभगात तब्बल ११ पदे रिक्त आहेत. परिणामी कामांची गुणवत्ता ढासळत असल्याचे दिसत आहे.
आर्वी उपविभागांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन उपविभाग आहेत. यात आष्टी-कारंजा या तालुक्यात स्वातंत्र्य विभाग आहेत. यात सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंत्याची २१ पदे मंजूर आहे. त्यात ११ पदे रिक्त आहेत. स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाची १८ पदे मंजूर आहेत. यात १३ पदे रिक्त आहेत. आरेखकाचे एक-एकच पद आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागातील रेखाचित्र विभागातील सर्व पदे रिक्त आहेत. यात सार्वजनिक बांधकाम उपविभाग निहाय सार्वजनिक बांधकाम विभागात (आर्वी) येथे आरेखकाचे एक पद मंजूर आहे. येथे एप्रिल महिन्यापासून एक आरेखकाचे पद रिक्त आहे.
कनिष्ठ अभियंत्याचे तीन पदे मंजूर आहे. त्यापैकी दोन पदे कार्यरत आहे तर एक पद रिक्त आहे. उपविभाग क्रमांक तीन आर्वी येथे कनिष्ठ अभियंत्याची मंजूर पदे चार आहे. यात कार्यरत एक आहे तर तीन पदे रिक्त आहेत. उपविभाग आष्टी येथे चार पदे मंजूर असून दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. कारंजा उपविभागात मंजूर पदे पाच आहेत. तीन पदे भरल असून दोन पदे रिक्त आहे. अभियंत्याची एकूण २१ पदे आहेत. त्यात फक्त १० अभियंत्यांच्या जागा भरण्यात आल्या आहेत. ११ पदे अजूनही रिक्त आहेत.
उपविभागात रिक्त असलेली ही आजची नाही तर गत दोन दोन वर्षांपासून रिक्त आहे. या संदर्भात वरिष्ठांना वारंवार निवेदन दिली तरी त्यांच्याकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने कामांचा खोळंबा झाला आहे.