महिला अत्याचारावर जनजागृती
By Admin | Updated: August 26, 2014 00:11 IST2014-08-26T00:11:33+5:302014-08-26T00:11:33+5:30
महिला पुनर्वसन केंद्र, दत्तपूर येथे चैतन्य सेवाभावी संस्था यांच्यावतीने महिलांवरील अत्याचाराबाबत जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक अनिल पारसकर होते

महिला अत्याचारावर जनजागृती
वर्धा : महिला पुनर्वसन केंद्र, दत्तपूर येथे चैतन्य सेवाभावी संस्था यांच्यावतीने महिलांवरील अत्याचाराबाबत जागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून पोलीस अधीक्षक अनिल पारसकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कारागृह अधीक्षक बावीसकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनीषा कुरसंगे, जिल्हा बालकल्याण समिती अध्यक्ष संगीता धनाड्य, सामान्य रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ संजय गाठे उपस्थित होते.
दत्तपूर केंद्राच्या काळजीवाहक उज्वला यांनी कार्यक्रमाला उपस्थित पीडित, अत्याचारी, निराधार महिलांना मान्यवरांचा परीचय दिला तसेच त्यांच्यासमोर अडचणी मांडण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना पारसकर यांनी येथे वास्तव्य करीत असलेल्या महिलांचे मानसिक संतुलन हे त्यांच्यावरील अत्याचारामुळे झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना नवजीवन मिळाले आहे. महिलांच्या मदतीकरिता पोलीस विभाग दक्ष आहे. यापुढे कोणत्याही महिलांवर अत्याचार होत असल्यास याची तक्रार महिलांकरिता असलेल्या हेल्प लाईनवर करावी. तसेच चाईल्ड हेल्प लाईन, कंट्रोल रूम येथेही तक्रार करता येईल. येथील महिलांना शासनाकडून आठवड्यातून एकदा समुपदेशन करण्यात येईल असेअ त्यांनी सांगितले. यानंतर बोलताना डॉ. घाटे यांनी महिलांना आरोग्यविषयक माहिती दिली. तसेच कारागृहाचे अधीक्षक बावीस्कर यांनी मार्गदर्शन केले.
मनिषा कुरसंगे यांनी भाषणातून निराधार, अत्याचार पीडित महिलांना शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या योजनेची माहिती दिली. तसेच निराधार महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरिता कागदपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. यासह मुलासोबत आईचे नाव लावण्याकरिता नवीन शासकीय नियमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अॅड. अनिता ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. आयोजनाला अर्चना कश्यप, आशा देशमुख व आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
महिला अत्याचारावर जनजागृती महिला अत्याचारावर जनजागृती