‘त्या’ पीडित कुटुंबाला शासनाकडून धान्याची तरतुद
By Admin | Updated: October 7, 2015 00:46 IST2015-10-07T00:46:50+5:302015-10-07T00:46:50+5:30
पैशाअभावी लोकवर्गणीतून रुग्णालयाचे देयक भरून सुटी घेतली.

‘त्या’ पीडित कुटुंबाला शासनाकडून धान्याची तरतुद
तहसीलदार : शासकीय नियमानुसार मदत
वायगाव (निपाणी): पैशाअभावी लोकवर्गणीतून रुग्णालयाचे देयक भरून सुटी घेतली. शिवाय आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलाला जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवत घरी असलेल्या मातेची करूण कहाणी ‘लोकमत’ने उजेडात आणताच वंदना पायघने यांच्या घराकडे मदतीचा ओघ सुरू झाला. शासनाच्यावतीने मंगळवारी तहसीलदारांनी येथे भेट देत ४५ किलो धान्याची तरतूद करून दिली.
‘लोकमत’चे वृत्त झळकताच शासनाच्या अधिकाऱ्यांसह अनेक सामाजिक संघटनांनी भेटी दिल्या. देवळी तहसीलदार तेजस्विनी जाधव, नायब तहसीलदार भागवत, मंडळ अधिकारी निमाळवे यांनी भेट देत बापुराव गवळी व त्याची मुलगी वंदना पायघने यांच्या कुटुंबाची चौकशी केली. दोनही कुटुंबांना मिळून ४५ किलो धान्य देण्याची तरतुद केली आहे. शासकीय नियमात जे बसेल ती सर्वच मदत या कुटुंबाला देण्यात येईल असे तहसीलदार जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरपंच दूर्गा अंकुश मडावी, सदस्य कविता चरडे, करुणा निमसडकर, वैशाली कराळे, पेंदाम, ढुमणे, सोनटक्के, खोडके, संदीप किटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, महिला अध्यक्ष शरयु वांदिले, कुमुद लाजुरकर, शारदा केनेंसह ग्रामस्थ उपस्थित होते.(वार्ताहर)