शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

‘थ्री फेज’ वीजपुरवठा दिवसा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

वीज वितरण कंपनीच्या वतीने तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारला रात्री १० वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. तीन दिवस वीजपुरवठा रात्री करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी, रात्रीला वन्यप्राण्यांचीही भीती : थंडीत कसे करावे ओलित?

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : रबी हंगाम सुरू झाल्यामुळे चणा, गहू तसेच खरिपातील कपाशी, तूर पिकांना ओलित सुरू झाले आहे. याकरिता वीज वितरण कंपनीने दिवसालाच कृषिपंपाकरिता वीजपुरवठा करावा , अशी चिकणी, जामणी, पढेगाव, निमगाव, सोनेगाव (आ.), दहेगाव, केळापूर सह परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.वीज वितरण कंपनीच्या वतीने तीन दिवस शुक्रवार, शनिवार, रविवारला रात्री १० वाजतापासून सकाळी ८ वाजेपर्यंत आणि सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे चार दिवस सकाळी ८ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत या प्रमाणे वीजपुरवठा केला जात आहे. तीन दिवस वीजपुरवठा रात्री करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच हाल होत असल्याचे दिसून येते.तीन दिवस रात्री १० वाजतानंतर वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना थंडीत कुडकुडत जावे लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती असते.रात्री जिवावर उदार होऊनच पिकांना ओलित करावे लागते, अशी शेतकऱ्यांची व्यथा आहे. ओलिताच्या अनुषंगाने वीज वितरण कंपनीने सातही दिवस दिवसाच वीजपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.रात्रीच्या वेळेला सरपटणाऱ्या तथा वन्यप्राण्यांचा शेतात मुक्त संचालन असल्यामुळे जिवाला धोका असते. अणि थंडीमुळे आजारी पडण्याची शक्यता असतो.- मनीष येणकर, शेतकरी जामणी.वीज वितरणचा दुजाभावघोराड - बागायती तालुका असलेल्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांप्रति वीज वितरण दुजाभाव करीत असून तालुक्यातील काही शेतकºयांकरिता त्रासदायक ठरत आहे. तरी वीज वितरण कंपनीने हा दुजाभाव थांबवावा, अशी मागणी होत आहे.सेलू तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांना कृषिपंपाचा थ्री फेज वीज पुरवठा निरंतर २४ तास दिला जातो, तर काही शेतकºयांना सिंगल फेजचा सामना करावा लागत आहे. त्यात आठवड्यातून चार दिवस रात्री-अपरात्री कृषिपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकºयांना ओलितासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हा दुजाभाव का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.सेलू तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने सेलू येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांनी पुढाकार घेऊन करीत असलेले कार्य पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांनासुद्धा २४ तास किंवा दिवसा निरंतर वीज पुरवठा देऊन शेतकऱ्यांप्रति असलेला वीज वितरणचा दुजाभाव दूर करण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :electricityवीज