ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा द्या
By Admin | Updated: June 8, 2014 00:07 IST2014-06-08T00:07:19+5:302014-06-08T00:07:19+5:30
ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याकरिता वरीष्ठांनी याकडे लक्ष देत सुविधा प्रदान कराव्या, अशी मागणी आधारवड ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराच्या

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा द्या
वर्धा : ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याकरिता वरीष्ठांनी याकडे लक्ष देत सुविधा प्रदान कराव्या, अशी मागणी आधारवड ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराच्या प्रतिनिधी मंडळाने केली. या मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यांना देण्यात आले. तसेच आरोग्य सेवेबाबत नागरिकांना येणार्या समस्या व तक्रारी निवारण करण्याबाबतचा उल्लेख या निवेदनात करण्यात आला.
निवेदनानुसार, सामान य रुग्णालयात गर्भवती महिला व वृद्ध नागरिक यांना प्रदान करण्यात येत असलेल्या रुग्णसेवेबाबत सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. नवृत्ती बी. राठोड यांच्यासोबत शिष्टमंडळाने या विषयांवर चर्चा केली. यात रुग्णालयातील रक्त नमुना संकलन केंद्र हे तळमजल्यावर असावे, कारण गर्भवती मातांना तपासणीकरिता व अन्य रुग्णांना तपासणी करण्याकरिता वर खाली चढावे लागते, तरी सदर केंद्र हे तळमजल्यावर आणण्यात यावे.
‘आयुष’ उपचार केंद्राबाबतची माहिती व हे केंद्र नेमके कुठे आहे, तिथवर जाण्याचा मार्ग हा फारच अवघड आणि धोक्याचा असल्याने योग्य उपाययोजना करण्यात यावी. रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना ताटकळत उभे राहावे लागते. यावर त्वरित कार्यवाही व्हावी.
यानंतर या विषयावर ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करताना डॉ. राठोड यांनी ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयातील सर्व विभागात नेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. तसेच तक्रारीचे वास्तव समजून घेतल. प्रतिनिधी मंडळाला सहकार्य करुन समस्यांचे निवारण त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी रुग्णालयातील सुरू झालेले डायलिसीस चे नवे युनिट तसेच कमी खर्चात व मोफत असलेल्या सुविधांचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन केले.
आधारवड परिवाराचे अध्यक्ष शामकांत देशपांडे यांनी सामान्य व गोरगरीब जनतेला मानवीय आधार व सेवाभाव वृत्तीने रुग्णसेवा मिळावी अशी मागणी केली. सामान्य रुग्णालयाला शासनाकडून सोयी सवलती पुरविण्याकरिता व अतिरिक्त मोकळी जागा तसेच ईमारत बांधकामाकरिता संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधून निधी उपलब्ध करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे.
यावेळी शिष्टमंडळात उपाध्यक्ष मोहन वाघ, सचिव प्रल्हाद गिरीपुंजे, वसंत खानखोज, कामगार नेते गुणवंत डकरे, रत्नाकर चरडे, सुभाष देशमुख, गोपाळ राऊत, डॉ. सुधाकर भुरे, रमेश खुरगे, माधव गोमासे इत्यादी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या मागण्यांवर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली.(स्थानिक प्रतिनिधी)