अल्पदरात आरोग्य सुविधा द्या

By Admin | Updated: August 5, 2015 02:10 IST2015-08-05T02:10:53+5:302015-08-05T02:10:53+5:30

कस्त्ुूरबा हेल्थ सोसायटी द्वारे संचालित सेवाग्राम येथील रुग्णालयात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर भारतातून रुग्ण उपचारासाठी येतात.

Provide health coverage in the short-term | अल्पदरात आरोग्य सुविधा द्या

अल्पदरात आरोग्य सुविधा द्या

रुग्णांची मागणी : लोकार्पण सेवा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वर्धा : कस्त्ुूरबा हेल्थ सोसायटी द्वारे संचालित सेवाग्राम येथील रुग्णालयात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर भारतातून रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे येथील रुग्णांना सवलतीच्या दरात सुविधा प्रदान करा, अशी मागणी सामान्य रुग्णांद्वारे केली जात आहे. याबाबत लोकार्पण सेवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी सलील यांना निवेदन सादर करण्यात आले.
या रुग्णालयाला केंद्र व राज्य शासनामार्फत अनुदान दिले जाते. १९५२ पासून स्थापना केलेल्या या आयुर्विज्ञान संस्थेचा उद्देश गोरगरिबांना सवलतीच्या दरात आरोग्य विषयक सुविधा प्रदान करणे हा होता. संस्थेच्या संस्थापक डॉ. सुशिला नायर शासनाने पुरविलेल्या अनुदानाच्या प्रमाणात गोरगरीब रुग्णांना स्वस्त दरात औषधोपचार सेवा-सुविधा पुरवित होत्या. परंतु त्यांच्या निधनानंतर काही वर्षातच संपूर्ण संस्थानात सेवा-सुविधांचे व्यापारीकरण झाले व मिळणाऱ्या सेवा-सुविधा महागड्या झाल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणारे हे संस्थान सामान्य रुग्णांना परवडणारे राहिलेले नाही. त्यामुळे अनेकदा रुग्णांना उपचार न करताच परत जावे लागते. त्यामुळे आशेने येत असलेल्या रुग्णांना पूर्वीप्रमाणेच अल्पदरात सुविधा देण्याची मागणी होत आहे. यामध्ये राज्य व केंद्र शासनाकडून ७५ टक्के अनुदान येते. पूर्वी रुग्णालयात विमाकार्डमध्ये ७५ टक्के सवलत मिळत होती. ती आता बंद करण्यात आली आहे, त्यामुळे ती पूर्ववत सुरू करण्यात यावी. येथील रुग्णालयात रुग्णांना अनेकदा काही बाबी समजत नाही. अशावेळी त्यांना त्या बाबी नीट समजावून सांगण्याचेरे सोय करण्यात यावी, औषधी आणखी अल्पदरात मिळाव्या, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
या मागण्यांसाठी लोकार्पण सेवा समितीच्या वतीने यापूर्वी ७ जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. चर्चेतून मागण्या सुटाव्यात अशी आग्रही भूमिका लोकार्पण सेवा समितीने व्यवस्थापनाला केली होती. परंतु व्यवस्थापनाने सदर मागण्यांसंदर्भात चर्चेबाबत पूर्णत: असमर्थता दर्शविली. यामुळे जिल्हाधिकारी सलिल यांना देण्यात आले.
शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष नाना अनकर, सचिव विलास खडसे, रहिम कुमार साहू, हातीम बाबू, संजय काकडे, नाना चावरे, दिनेश वाकडे, शाम जगताप, विजय धुमाळे, रवी भुजाडे व इतर नागरिक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Provide health coverage in the short-term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.