शेतमजुरांना अन्न सुरक्षा द्या
By Admin | Updated: August 19, 2015 02:24 IST2015-08-19T02:24:40+5:302015-08-19T02:24:40+5:30
अन्न सुरक्षा योजनेत शेतमजुरांचा उल्लेख नाही. त्यामुळे ते अन्नसुरक्षेच्या लाभापासून वंचित राहणार आहे.

शेतमजुरांना अन्न सुरक्षा द्या
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शासन निर्णयात उल्लेख नाही
वर्धा : अन्न सुरक्षा योजनेत शेतमजुरांचा उल्लेख नाही. त्यामुळे ते अन्नसुरक्षेच्या लाभापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे या शासननिर्णयात बदल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनात करण्यात आली.
निवेदनानुसार राज्यशासनाने ५ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत लाभ मिळवून दिला. ही प्रशसनीय बाब आहे. परंतु २४ जुलै २०१५ व ५ आॅगस्ट २०१५ या दोन्ही शासननिर्णयात शेतमजुरांना उल्लेख नसल्यामुळे शेतमजुरांना आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या शासननिर्णयाचा शासनाने फेरविचार करावा आणि वस्तुनिष्ठ निर्णय घेऊन शेतमजुरांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करावा. शासननिर्णयात स्पष्टता आणावी, अशी मागणी आमआदमी पार्टीचे तालुका संयोजक पंकज सत्यकार यांची निवेदनाद्वारे केली. तसेच जिल्हाधिकारी यांनी निवेदनाचा पाठपुरावा करुन शेतमजुरांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून द्याव अशी मागणी केली आहे.(शहर प्रतिनिधी)