रात्रीपेक्षा दिवसा वीजपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:12+5:30

पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, या आशेवर रबीची पेरणीपूर्व मशागत करून नव्या जोमाने कामाला लागला आहे.

Provide electricity by day rather than at night | रात्रीपेक्षा दिवसा वीजपुरवठा करा

रात्रीपेक्षा दिवसा वीजपुरवठा करा

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : जीवावर उदार होऊन करावे लागतेच ओलित

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : वीज महावितरण कंपनीच्या वतीने आठवड्यातून तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे पिकांना ओलित करणे अवघड झाले आहे. रात्री जीवावर उदार होऊनच ओलित करावे लागत आहे. दिवसाच वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर मोडलेला शेतकरी उसनवारी आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत रबीच्या हंगामाकडे वळला आहे. खरिपाची तूट रबीमध्ये भरून निघेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढू, या आशेवर रबीची पेरणीपूर्व मशागत करून नव्या जोमाने कामाला लागला आहे. मात्र आठवड्यातून तीन दिवस दिवस वीजपुरवठा आणि आठवड्यातून चार दिवस रात्री वीजपुरवठा केला जात असून दिवसभर शेतात राबायचे आणि रात्री पुन्हा शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जायचे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकऱ्यांचा कुणीच कैवारी नाही, अशी भावना तो व्यक्त करीत आहे.
नव्याने आलेल्या सरकारकडून परिसरातील शेतकऱ्यांना आता तरी दिवसा वीजपुरवठा मिळेल, ही आस लागली असून निदान रात्रीला तरी शांतपणे झोप घेऊ, या आशेवर बळीराजा बसला आहे.

रबी हंगामातील पिकांची लागवड सुरू असून दिवसभर शेतात काम करायचे आणि रात्री १० नंतर पुन्हा शेतात जाऊन पिकांना पाणी द्यायचे. यामुळे शेतकरी यांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होत असून महावितरण कंपनीने दिवसभर वीजपुरवठा करावा; जेणेकरून शेतकºयांची हेळसांड होणार नाही
- अशोक सुपारे, माजी पं. स. सदस्य, अल्लीपूर.

शेतकºयाला संपूर्न जगाचा पोशिंदा म्हटले जाते, पण या पोशिंद्याचीच शासन, प्रशासन हेडसांड करते. एवढ्या थंडीत पिकांना पाणी द्यायला जावे लागते. एकटे शेतात रात्री काम करणे जीवावर बेतू शकते याकडे लोकप्रतिनिनी लक्ष द्यावे.
- पांडुरंग ढगे, शेतकरी अल्लीपुर.

Web Title: Provide electricity by day rather than at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज