महिला सुरक्षित तर देश सुरक्षित
By Admin | Updated: November 23, 2014 23:25 IST2014-11-23T23:25:28+5:302014-11-23T23:25:28+5:30
अत्यंत धकाधकीच्या आजच्या जीवन पद्धतीत महिलांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा ठरत आहे. महिलांची प्रगती विकासास कारण ठरत अहे. त्यामुळे महिला सुरक्षित राहतील तरच समाज व पर्यायाने देश

महिला सुरक्षित तर देश सुरक्षित
ममता अफुने यांचे विचार : स्वयंसुरक्षा विषयावर मार्गदर्शन
वर्धा : अत्यंत धकाधकीच्या आजच्या जीवन पद्धतीत महिलांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा ठरत आहे. महिलांची प्रगती विकासास कारण ठरत अहे. त्यामुळे महिला सुरक्षित राहतील तरच समाज व पर्यायाने देश सुरक्षित राहील असे प्रतिपादन महिला सुरक्षा पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरीक्षक ममता अफुने यांनी केले.
न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिंनींना स्वयंसुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या. विद्यार्थिंनींना समाजात वावरताना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांनी या समस्यांना सामोरे जाण्यासाठी स्वत: सिद्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी महिला व युवतींनी स्वयंसुरक्षा कशी करावी याबाबत अफुने यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्राचार्य विजय व्यास म्हणाले, स्त्रियांनी आपल्यातील उपजत शक्तीचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच कुठेही त्यांनी जागरूक राहणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पर्यवेक्षिका साने, गुज्जेवार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अनघा आगवन यांनी केले. संचालन स्मिता गाढवे यांनी तर आभार सुवर्णा थूल यांनी मानले. यशस्वीतेकरिता वासंती कुलकर्णी, लता मोकलकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)