वर्धेतून दोन नव्या रेल्वे गाड्यांचा प्रस्ताव
By Admin | Updated: December 23, 2014 23:08 IST2014-12-23T23:08:40+5:302014-12-23T23:08:40+5:30
येथील जंक्शनवरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने सेवाग्राम ते मुंबई व आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने वर्धा ते पुणे अशा नव्या दोन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव खा. रामदास तडस यांनी

वर्धेतून दोन नव्या रेल्वे गाड्यांचा प्रस्ताव
खासदारांची माहिती : महत्त्वपूर्ण गाड्यांचे थांबे देण्याची केंद्राकडे शिफारस
वर्धा : येथील जंक्शनवरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने सेवाग्राम ते मुंबई व आचार्य विनोबा भावे यांच्या नावाने वर्धा ते पुणे अशा नव्या दोन गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव खा. रामदास तडस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यापुढे ठेवला आहे.
यासोबतच जिल्ह्यातील विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारी, शेतकरी यांच्या सोईसाठी गुजरात, आंध्र प्रदेश व विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर (रेल्वे), सिंदी(रेल्वे) व हिंगणघाट येथे थांबे देण्याची मागणीही करण्यात आली आहे. हिंगणघाट, पुलगाव रेल्वे स्थानकावर पीएनआर मशीन उपलब्ध करून द्यावी. चांदूर (रेल्वे) येथील उड्डाण बांधकाम सुरू करण्याची परवानगी द्यावी, याकडेही लक्ष वेधण्यात आले. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी सदर मागण्यांबाबत आश्वस्त केल्याची माहिती खा. तडस यांनी दिली.(जिल्हा प्रतिनिधी)