जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव लालफीतशाहीत

By Admin | Updated: January 17, 2015 23:03 IST2015-01-17T23:03:23+5:302015-01-17T23:03:23+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत जिर्णावस्थेत आहे. पावसाळ्यात या इमारतीला गळती लागते. याच अनुषंगाने नवीन इमारत बांधकामाचा सुमारे २० कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला.

Proposal for new building of District Collectorate | जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव लालफीतशाहीत

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव लालफीतशाहीत

वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत जिर्णावस्थेत आहे. पावसाळ्यात या इमारतीला गळती लागते. याच अनुषंगाने नवीन इमारत बांधकामाचा सुमारे २० कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला. या प्रस्तावालाही लालफितशाहीचा सामना करावा लागत आहे. मागील काही वर्षांपासून या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरीच मिळाली नसल्याची बाब पुढे आली आहे.
नागपूर आयुक्तांच्या पत्राच्या आधारे १७ सप्टेंबर २०१२ रोजी शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठविला आहे. यानंतर तब्बल दोन वर्षांनी म्हणजेच २२ जानेवारी २०१४ रोजी मुंबई येथील सचिव समितीच्या सभेमध्ये अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नमुना नकाशाच्या आधारे वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचा नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अकोला येथील नकाशा व आराखडे मागविण्यात आले असून नव्या प्रस्तावाची प्रक्रिया जिल्हा प्रशासन करीत आहे.(जिल्हा प्रतिनिधी)
आर्वी तहसील व एसडीएम कार्यालयाचा प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत
जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणेच आर्वी तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव २० जानेवारी २०१३ पासून शासन दरबारी धूळखात आहे. या प्रस्तावाची दुय्यम प्रत ३ डिसेंबर २०१३ रोजी खास दुतामार्फत शासनाला पाठविण्यात आला आहे. याउपरही या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. या प्रस्तावाच्याही मंजुरी प्रतीक्षा जिल्हा प्रशासन करीत आहे.
वर्धा, सेलू, हिंगणघाट तहसील कार्यालय बांधकाम प्रगतीपथावर
वर्धा, सेलू व हिंगणघाट तहसील कार्यालयांच्या नवीन इमारतींना मात्र शासनाने मंजुरी दिली. यानंतर सदर इमारतींचे बांधकाम आजघडीला प्रगतीपथावर आहे.
देवळी, कारंजा, आष्टी व समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून त्या ठिकाणी कार्यालयाचा कारभार देखील सुरू झालेला आहे.

Web Title: Proposal for new building of District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.