प्रकल्पग्रस्तांना झुडपांचे गाव
By Admin | Updated: February 18, 2015 01:57 IST2015-02-18T01:57:22+5:302015-02-18T01:57:22+5:30
जिल्ह्यात झालेल्या कुठल्याही पुनर्वसनात राहणाऱ्या नागरिकांना १८ नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचे आता समोर येवू लागले आहे.

प्रकल्पग्रस्तांना झुडपांचे गाव
वर्धा : जिल्ह्यात झालेल्या कुठल्याही पुनर्वसनात राहणाऱ्या नागरिकांना १८ नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचे आता समोर येवू लागले आहे. सुकळी प्रकल्पात आलेल्यांचे नटाळा व आंजी (मोठी) येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील नागरिकांनाही नागरी सुविधांकरिता लढा देण्याची वेळी आली आहे.
सुकळी प्रकल्पात जमिनी गेलेल्या २२५ परिवाराचे आंजी (मोठी) लागत पुनर्वसन केले. या गावाला पिंपळगाव पुनर्वसन असे नाव देण्यात आले. गावाचे पुनर्वसन करताना तिथे १८ नागरी सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र तसे न करता या गावात कुठलीही सुविधा न देता नागरिकांना तिथे जागा देण्यात आली. या गावात ना रस्ता ना नाल्या अशी स्थिती आहे. गावात सुविधा पुरविण्याकरिता या भागातील नागरिक संबंधीत विभागाकडे चकरा मारत आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे साऱ्यांचे दुर्लक्ष होते आहे. पुनर्वसन झाल्यापासून संबंधित विभागाने या गावाकडे कधी येवूनही पाहिले नाही. येथील पुनर्वसन अधिनियम १९९९ कलम १० (ड) अंतर्गत पूर्ण झाल्याचे दाखविले आहे. वास्तवात मात्र या गावात कुठल्याही समस्या देण्यात आल्या नाहीत. कागदावर मात्र त्या दाविण्यात आल्या आहेत. गावात येत्या दिवसात सर्व सुविधा देण्यात याव्या अन्यथा गावकरी आंदोलन करतील, असा इशारा सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवदेनाद्वारे दिला आहे.(प्रतिनिधी)