वृक्षलागवडीतून ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:19+5:30

राज्यात नव्हे तर देशात गाजत असलेल्या ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेधार्थ आज वृक्षलावकड करण्यात आली. इतक्यावरच वृक्षपे्रमी थांबले नाही तर त्यांनी कॅन्डल मार्च काढून आपला रोष व्यक्त केला.

Prohibition of 'Aray' tree-cutting case from tree plantation | वृक्षलागवडीतून ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेध

वृक्षलागवडीतून ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेध

Next
ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन प्रेमींचा कँण्डल मार्च : तातडीने योग्य कार्यवाही करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राज्यात नव्हे तर देशात गाजत असलेल्या ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेधार्थ आज वृक्षलावकड करण्यात आली. इतक्यावरच वृक्षपे्रमी थांबले नाही तर त्यांनी कॅन्डल मार्च काढून आपला रोष व्यक्त केला.
विकासाच्या नावाखाली ‘आरे’ च्या जंगलातील सुमारे २,५०० डेरेदार वृक्ष तोडली जात आहेत. सदर निर्णय पर्यावरणासाठी धोक्याचा असून वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे शासनाकडून वृक्ष लागवड उपक्रम राबविल्या जात आहे.
परंतु, विकासाच्या नावाखाली केली जात असलेली वृक्षतोड ही निंदनिय आहे. सदर वृक्षतोडीच्या विरोधात हिंगणघाट शहरातील पर्यावरण प्रेमी एकवटले असून त्यांनी निषेध नोंदविला आहे.

Web Title: Prohibition of 'Aray' tree-cutting case from tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.