प्रतिबंधित बियाणे कायदा झुगारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:28 PM2019-06-20T23:28:12+5:302019-06-20T23:28:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : जैविक, जनुकीय बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत प्रतिबंध असतानाही हजारो ...

Prohibited restricted seed law | प्रतिबंधित बियाणे कायदा झुगारला

प्रतिबंधित बियाणे कायदा झुगारला

Next
ठळक मुद्देशेतकरी संघटनेचे आंदोलन : शेगाव (कुंड) येथे शेतकऱ्यांनी केली कपाशीची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : जैविक, जनुकीय बियाण्यांवर पर्यावरण कायदा, बियाणे कायदा व जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत प्रतिबंध असतानाही हजारो शेतकऱ्यांनी हा कायदा झुगारून शेगांव (कुंड) येथे कपाशी पिकाची लागवड केली. शेतकरी संघटनेच्या नेतृत्वातील या अनोख्या आंदोलनामध्ये सहभागी शेतकऱ्यांनी मधुसूदन हरणे यांच्या शेतात प्रतिबंधित अप्रमाणिीत एचटीबीटी कापूस बियाण्याची लागवड करून प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे.
देशात अस्तित्वात असलेल्या कायद्याने शेतकºयांचे निवडीचे स्वातंत्र्य हिरावले आहे. शेतकºयांनी त्यांच्या शेतात कोणते बियाणे वापरायचे हा अधिकार त्यांचा आहे. जगातील प्रगत देशांत नवनविन संशोधित जैविक व जनुकीय बियाण्यांचा वापर करीत आहे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी आणि उत्पादनात वाढ झाली आहे. बियाण्यांचा वापर असलेल्या देशातील आयात केलेले तेल, दाळ, मोहरी चालते; तर मग देशातील शेतकºयांना ते तंत्रज्ञान युक्त बियाणे वापरायला बंदी कां? असा प्रश्न उपस्थित करून आता ही तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याची लढाई आहे.
शेतीत तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. हे आंदोलन शेतकºयांनी गावागावात करावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशिकर, राम नेवले, यांनी केले. यावेळी शैला देशपांडे, ललित बहाळे, युवा आघाडी अध्यक्ष सतीश दाणी, नंदू काळे, नंदू खेरडे, मदन कामडी, लक्ष्मीकांत कवूटकर, पांडुरंग भालशंकर, सुधीर सातपुते, मधुसूदन हरणे, जिल्हाप्रमुख उल्हास कोंटबकर, प्रा. मधुकरराव झोटिंग, सुभाष बोकडे यांची उपस्थिती होती. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी हेमराज इखार, गणेश मुटे, सारंग दरणे, संजय चौधरी, राजू नगराळे, नामदेव मानकर, संदीप ठाकरे, सुधाकर अगडे, विजय धोटे, रोहित हरणे, प्रवीण भोयर, विजय किलनाके यांनी सहकार्य केले. आंदोलनस्थळाल कृषी अधिकाºयांनी भेट देऊन लागवड केलेले काही बियाणे जप्त केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. तरिही मोठ्या जोशात शेतकºयांनी आंदोलन करुन शासनाच्या धोरणाला आव्हान दिले आहे.

गावागावांत वेगवेगळ्या दिवशी करणार बियाण्यांची लागवड
आजच्या शेगाव (कुंड) येथील या शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलनात पुरुषांसह महिलांची मोठी उपस्थिती होती. हे आंदोलन वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिकपणे करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या आंदोलनात नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. सर्व मान्यवरांनी प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. या आदोलनानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आंदोलनामध्ये सहभागी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. या सभेचे संचालन मधुसूदन हरणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार चंद्रमणी भगत यांनी मानले.

राज्यात कापसाच्या एचटीबीटी बियाणे विक्री अनधिकृत असून लागवडीसाठी मनाई आहे. अशा स्थितीत शेतकरी संघटनेद्वारा शेगाव (कुंड) येथील मधुसूदन हरणे यांच्या शेतात कापसाच्या या प्रतिबंधित बियाण्याची केलेली लागवड कायदा मोडणारी आहे. घटनास्थळावरुन ५० ग्रॅम बियाणे ताब्यात घेण्यात आले. या बियाण्यांचा प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
राष्ट्रपाल मेश्राम, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

Web Title: Prohibited restricted seed law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.