ग्रामीण पोलीस ठाण्याची निर्मिती करा

By Admin | Updated: November 8, 2015 02:14 IST2015-11-08T02:14:11+5:302015-11-08T02:14:11+5:30

राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वे मार्गावर असलेले हे शहर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून जवळपास सव्वा लाखांच्रूा घरात आहे.

Produce the rural police station | ग्रामीण पोलीस ठाण्याची निर्मिती करा

ग्रामीण पोलीस ठाण्याची निर्मिती करा

गुन्हेगारीमध्ये होतेय वाढ : लोकजनशक्ती पक्षाचे मुख्यमंत्र्यांना साकडे
हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वे मार्गावर असलेले हे शहर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून जवळपास सव्वा लाखांच्रूा घरात आहे. शहराचा विस्तारही झपाट्याने होते. गुन्हेगारीही वाढीस लागली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालताना पोलिसांची दमछाक होते. यामुळे शहरात पुन्हा एक ‘ग्रामीण पोलीस ठाणे’ निर्माण करावे, ही मागणी जोर धरत आहे. लोकजनशक्ती पार्टीने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर केले आहे.
शहरासोबत ग्रामीण परिसरातील गावांची जबाबदारीही येथील पोलीस स्टेशनवर आहे. यामुळे याचा अतिरिक्त ताण पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येत आहे. शासनाने हिंगणघाट येथे अतिरिक्त स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन निर्माण करण्याची न्याय मागणी लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष तिमांडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून केली आहे.
निवेदनात सध्या हिंगणघाट शहराची वाढती लोकसंख्या, शहर आणि परिसरातील उद्योगक्षेत्रात झालेली वाढ, ग्रामीण जनतेची मुख्य बाजारपेठ, विदर्भातील क्रमांक दोनची कृषी उत्पन्न बाजारपेठ, परिणामी वाहनांची होणारी प्रचंड वर्दळ, वाहनांच्या संख्येत झालेली वाढ, ग्रामीण भागातील ६० गावांचा अतिरिक्त ताण हा पोलीस यंत्रणेवर पडत आहे. हिंगणघाट येथे स्वतंत्र अतिरिक्त ग्रामीण पोलीस स्टेशन निर्माण केल्यास गुन्हेगारीवर आळा घालण्यास मदत होऊ शकेल.
शहरात केवळ ६ वाहतूक पोलीस कर्मचारी आहेत. पोलीस ठाण्यामध्ये फर्निचरची कमतरता आहे. निवासस्थाने समस्याग्रस्त आहे. अनेक दिवसांपासून त्यात सुधारणा करण्यात आली नाही. सध्या १३२ पोलीस कर्मचारी असून २८ क्वॉर्टर त्यांना राहण्यास उपलब्ध आहेत. वसाहतीची समस्या गंभीर असून शासनाने दुर्लक्ष केल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. पडक्या व जीर्ण झालेल्या घरांमध्ये त्यांना राहावे लागत आहे. जनतेच्या रक्षणासाठी २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाने त्वरित सोडविणे गरजेचे आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी अत्यंत कमी आहेत. १३२ पोलीस कर्मचाऱ्यांची मंजूर पदे हे शहर व ग्रामीण भागासाठी आहेत. पैकी ११६ कर्मचारी कार्यरत आहेत. १८ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो. लोसंख्येच्या तुलनेत २०० पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने नाहीत. ८० टक्के कर्मचाऱ्यांना बाहेर गावाहून ये-जा करावी लागते. याचा त्यांना नाहक त्रास व भुर्दंड सहन करावा लागत आहे. जनतेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना शासनाने न्याय देण्याची गरज व्यक्त होत आहे.
हिंगणघाट येथे नवीन सुसज्ज सुविधा असलेली पोलीस कर्मचारी वसाहत निर्माण करणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभिर्याने विचार करीत त्वरित लक्ष देत समस्या सोडवावी. अतिरिक्त स्वतंत्र ग्रामीण पोलीस स्टेशन निर्माण करण्याबाबत आमदार समीर कुणावार यांनीही गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी न्याय मागणी लोक जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष तिमांडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री दुब्बावार, केशव तितरे, राजेंद्र मुनोत, सुभाष मिसाळ, मोरेश्वर पिंपळशेंडे, गोविंदा गायकवाड, कमलाकर कावळे, गोविंदा दांडेकर, चंपत बावणे, शब्बीर चुडीवाले, मधुकर डंभारे, मो. याकुब, किसना किन्नाके, चित्रा पाटणे, सपना मुने, पितांबरी तिमांडे, रिना तुळसकर, शकुंतला नाशिरकर, सुवर्णा किन्हेकर, अर्चना साबळे, संगीता शेंडे, छाया मिसाळ, प्रमिंला ठाकूर आदींनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Produce the rural police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.