‘त्या’ मुख्याध्यापकावरील कार्यवाही अद्यापही प्रस्तावितच
By Admin | Updated: November 3, 2015 02:45 IST2015-11-03T02:45:34+5:302015-11-03T02:45:34+5:30
जिल्हा परिषदेच्या येथील शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील नऊ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी

‘त्या’ मुख्याध्यापकावरील कार्यवाही अद्यापही प्रस्तावितच
विजयगोपाल : जिल्हा परिषदेच्या येथील शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील नऊ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला. मात्र शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला. याला आज १५ दिवसांचा कालावधी होत असला तरी या मुख्याध्यापकावर अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या शिक्षकाचे नाव क्रांतीकुमार रा. पाजनकर रा. पुलगाव असे आहे.
येथील जि.प. शाळेत क्रांतीकुमार पाजनकर हा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्याने शाळेत तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चिमुकलीशी अश्लील चाळे सुरू केले. हा प्रकार असह्य झाल्याने त्या मुलीने ही गोष्ट तिच्या वर्गशिक्षिकेला सांगितली. त्या शिक्षिकेने लगेच आपल्या सहकारी शिक्षकांना सांगत याची माहिती केंद ्रप्रमुखांना दिली. केंद्रप्रमुखांनी गटशिक्षणाधिकारी यांना बोलावून प्रकरणाची शहानिशा केली व पाजनकर याला बोलावून विचारपूस केली.
पाजनकर यानेही गटशिक्षणाधिकारी यांच्या समक्ष आपण जे कृत्य केल्याचे लेखी स्वरूपात मान्य केले. त्याचे बयाण व चौकशी अहवालानुसार प्रकरण तयार करून शिक्षण विभागात ते सादर केले. तेथून सदर प्रकरण प्रशासकीय अधिकाऱ्याकडे गेले. त्यांनी चौकशी करून ती फाईल जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविल्याची माहिती आहे. याला १५ दिवसांचा कालावधी झाला तरी या शिक्षकावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने गावात रोष व्यक्त होत आहे.
पाजनकर याने या पूर्वी वाफगाव येथील शाळेत असताना सुद्धा असे कृत्य केल्याचे शिक्षण अधिकारी मेश्राम यांनी सांगितले. या शिक्षकावर निलंबणाची कार्यवाही करण्याची शिफारस जि.प. प्रशासनाकडे केल्याची माहिती आहे.(वार्ताहर)
हे प्रकरण १५ आॅक्टोबरला उघडकीस आले. मात्र शिक्षणविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आपसी चौकशीमळे सदर प्रकरणाची मला २६ आॅक्टोबरला माहिती मिळाली. त्यानंतर लगेच मी शाळेला भेट दिली. शिक्षण समिती अध्यक्षांनी माहिती न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली. शिक्षक पेशाला काळीमा फासणाऱ्या या मुख्याध्यापकावर कठोर कार्यवाही करण्याची गरज आहे.
- नीलम बिन्नोड, सरपंच, ग्रा.पं. विजयगोपाल.
या प्रकरणाची चौकशी केली असता स्वत: मुख्याध्यापक पाजनकरने केलेल्या कृत्याची लेखी स्वरूपात पंचा समोर कबुली दिली. त्याचे बयाण व चौकशी अहवालासह प्रकरण वरिष्ठांकडे पाठविले आहे.
- सतीश आत्राम, गटशिक्षणाधिकारी, देवळी