आमदारांनी जाणल्या एसटी कर्मचाºयांच्या अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:12 IST2017-10-20T23:12:14+5:302017-10-20T23:12:24+5:30
मंगळवार १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचाºयांच्या आंदोलन मंडपाला आ. समीर कुणावार यांनी भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आमदारांनी जाणल्या एसटी कर्मचाºयांच्या अडचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
हिगणघाट : मंगळवार १७ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या एस.टी. कर्मचाºयांच्या आंदोलन मंडपाला आ. समीर कुणावार यांनी भेट देवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मागण्यासंबंधी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
पदनिहाय वेतन श्रेणीसह सातव्या वेतन आयोगाचे मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात एस. टी. कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपात हिंगणघाट आगाराचे ३६० कर्मचारी स्वच्छेने सहभागी झाले आहे. एकूण ६८ नियते व तब्बल ४२६ फेºया रद्द झालेल्या आहेत. आ. कुणावार यांनी १८ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता हिंगणघाट एस. टी. आगारातील संपकरी कर्मचाºयांच्या मंडपाला भेट दिली. यावेळी पं. स. सभापती गंगाधर कोल्हे, भाजपा जिल्हा चिटणीस प्रा. किरण वैद्य उपस्थित होते. कामगार संघटनेचे आगार सचिव हितेंद्र हेमके, महाराष्ट्र मोटर कामगार संघाचे यशवंत डाखोरे, इंटकचे बाळू मैंद यांना एसटी कामगाराच्या विविध मागण्या आमदारांना अवगत करून समस्या मांडल्या. यावेळी आमदारांनी संपूर्ण मागण्यांचा आढावा घेवून गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाºयांना तुटपुंज्या पगारावर उपजिविका करावी लागत असल्याचे मान्य करून त्यांचेवर अन्याय होत असल्याची कबुली यावेळी दिली. एस.टी. कर्मचाºयांच्या सर्व मागण्या या रास्त असून त्यांच्या व्यथा शासनदरबारी मांडणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या आंदोलनाबाबात त्यांनी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री या आंदोलनावर लवकरच सकारात्मक तोडगा काढतील असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मेंदुची शस्त्रक्रिया झाल्याने भविष्यात काम करण्यास असमर्थ असणारे रापमच्या हिंगणघाट आगारातील चालक वावरे यांना आ. कुणावार यांनी पुढील उपचारासाठी १५ हजाराची मदत दिली. आ. कुणावार यांनी एस. टी. कर्मचाºयांच्या आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेचे कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले.