भाग्यशाली विजेता सोडतीत सखींवर बक्षिसांची लयलूट
By Admin | Updated: July 9, 2016 02:24 IST2016-07-09T02:24:52+5:302016-07-09T02:24:52+5:30
लोकमत सखी मंच नेहमीच महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. सखींकरिता आयोजित बक्षीस योजनेची सोडत काढण्यात आली.

भाग्यशाली विजेता सोडतीत सखींवर बक्षिसांची लयलूट
घांगळे सभागृह व घरकुल मसाले प्रस्तूत लकी ड्रॉ
वर्धा : लोकमत सखी मंच नेहमीच महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. सखींकरिता आयोजित बक्षीस योजनेची सोडत काढण्यात आली. या सोडतीत घरकुल मसाले व घांगळे सभागृह व लॉन यांच्याकडून साड्या तसेच विविध बक्षीस देण्यात येणार होते.
सखी मंच सदस्यांकरिता ही योजना होती. हा लकी ड्रॉ घांगळे सभागृह व लॉन यांचे संचालक सचिन घांगळे व अशोेक भारती, सर्वांगिण ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष राजेश कोल्हे यांच्या हस्ते लोकमत कार्यालय येथे काढण्यात आला. या भाग्यवंत विजेत्यांची यादी जाहीर केली. यातील भाग्यशाली सखी मंच सदस्यांना साड्या देण्यात येणार असून अन्य विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल.(उपक्रम प्रतिनिधी)