शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गीतेतील तत्त्व जीवनाला मार्गदर्शन करणारे

By admin | Updated: December 7, 2015 06:04 IST

भगवद गीता हा भारतातील महान ग्रंथापैकी एक आहे. गीतेतील महावाक्यांना अमृतवचन असे संबोधले जाते. कारण

उषादीदी : जीवन परिवर्तनात भगवद् गीता योगदानावर प्रवचनवर्धा : भगवद गीता हा भारतातील महान ग्रंथापैकी एक आहे. गीतेतील महावाक्यांना अमृतवचन असे संबोधले जाते. कारण वचनातील तत्वात मानवी जीवनात अमरत्त्व प्रदान करण्याची क्षमता आहे. जगण्याच्या या संघर्षात जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन गीतेतून मिळते, असे विचार राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषादीदी यांनी व्यक्त केले. जीवन परिवर्तनात भगवद्गीतेचे योगदान या विषयावर प्रवचन देताना त्या बोलत होत्या.येथील ब्रह्मकुमारी केंद्राच्यावतीने आयोजित प्रवचनाचे रविवारी सायंकाळी खा. रामदास तडस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर नागपूर क्षेत्राच्या संचालिका रजनीदीदी, वर्धा केंद्राच्या संचालिका माधुरीदीदी, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, जि.प. सदस्य विरेंद्र रणनवरे, पोलीस उपअधीक्षक रविंद्र किल्लेकर, मनीषादीदी, मंगलादीदी, लालवाणी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रार्थना गीत घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच अनुजा हिने स्वागत नृत्य सादर केले. यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन केल्यावर उषादीदी यांच्या प्रवचनाला प्रारंभ झाला.पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गीता हा ग्रंथ भगवान उवाच् आहे. त्यामुळे या ग्रंथाला विशेष महत्त्व ताहे. गीतेत चारही वेदांचा सार आहे. गीता ग्रंथाला मायेची उपमा दिली जाते. या जगातील उर्वरीत ग्रंथ ही गीतेची लेकरं आहे. जगभरातील धर्मग्रंथात सांगितलेल्या ज्ञानाचे गीतेतील तत्वज्ञानाशी साधर्म्य आहे. भगवद गीतेत हिंदू या शब्दाचा उल्लेख आढळत नाही. हा ग्रंथ मानव कल्याण्यासाठी आहे. यात विशुद्ध आध्यात्मिक ज्ञानाच अंतर्भाव आहे. या ग्रंथाचा कोणताही धर्म अथवा संप्रदायासोबत सबंध नसून केवळ मानव कल्याण्याचा सार आहे. महर्षी वेदव्यास यांना समधी अवस्थेत गीता ग्रंथाची ज्ञानप्राप्ती झाली होती. नास्ट्रोडॅमस नामक भविषवेत्त्याने एका गोलात संपूर्ण जगाचे भविष्य पाहिले असे म्हणतात. ते त्याने काव्यरूपात मांडले. मात्र भारतीतील तत्कालीन ऋषी, मुनी यांनी वर्तमान आणि भविष्यातील समाज व्यवस्थेवर भाष्य केले होते. केवळ भाष्यच न करता समाजाला उदभवणाऱ्या समस्या आणि उपाययोजना त्यात सांगितल्या आहे, असे त्यांनी प्रवचनात सांगितले. यावेळी शेकडो श्रोतावर्ग उपस्थित होता.(स्थानिक प्रतिनिधी)