गीतेतील तत्त्व जीवनाला मार्गदर्शन करणारे

By Admin | Updated: December 7, 2015 06:04 IST2015-12-07T06:04:11+5:302015-12-07T06:04:11+5:30

भगवद गीता हा भारतातील महान ग्रंथापैकी एक आहे. गीतेतील महावाक्यांना अमृतवचन असे संबोधले जाते. कारण

The principles of the Gita guide the life | गीतेतील तत्त्व जीवनाला मार्गदर्शन करणारे

गीतेतील तत्त्व जीवनाला मार्गदर्शन करणारे

उषादीदी : जीवन परिवर्तनात भगवद् गीता योगदानावर प्रवचन
वर्धा : भगवद गीता हा भारतातील महान ग्रंथापैकी एक आहे. गीतेतील महावाक्यांना अमृतवचन असे संबोधले जाते. कारण वचनातील तत्वात मानवी जीवनात अमरत्त्व प्रदान करण्याची क्षमता आहे. जगण्याच्या या संघर्षात जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन गीतेतून मिळते, असे विचार राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषादीदी यांनी व्यक्त केले. जीवन परिवर्तनात भगवद्गीतेचे योगदान या विषयावर प्रवचन देताना त्या बोलत होत्या.
येथील ब्रह्मकुमारी केंद्राच्यावतीने आयोजित प्रवचनाचे रविवारी सायंकाळी खा. रामदास तडस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर नागपूर क्षेत्राच्या संचालिका रजनीदीदी, वर्धा केंद्राच्या संचालिका माधुरीदीदी, नगराध्यक्ष त्रिवेणी कुत्तरमारे, जि.प. सदस्य विरेंद्र रणनवरे, पोलीस उपअधीक्षक रविंद्र किल्लेकर, मनीषादीदी, मंगलादीदी, लालवाणी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रार्थना गीत घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच अनुजा हिने स्वागत नृत्य सादर केले. यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन केल्यावर उषादीदी यांच्या प्रवचनाला प्रारंभ झाला.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, गीता हा ग्रंथ भगवान उवाच् आहे. त्यामुळे या ग्रंथाला विशेष महत्त्व ताहे. गीतेत चारही वेदांचा सार आहे. गीता ग्रंथाला मायेची उपमा दिली जाते. या जगातील उर्वरीत ग्रंथ ही गीतेची लेकरं आहे. जगभरातील धर्मग्रंथात सांगितलेल्या ज्ञानाचे गीतेतील तत्वज्ञानाशी साधर्म्य आहे.
भगवद गीतेत हिंदू या शब्दाचा उल्लेख आढळत नाही. हा ग्रंथ मानव कल्याण्यासाठी आहे. यात विशुद्ध आध्यात्मिक ज्ञानाच अंतर्भाव आहे. या ग्रंथाचा कोणताही धर्म अथवा संप्रदायासोबत सबंध नसून केवळ मानव कल्याण्याचा सार आहे. महर्षी वेदव्यास यांना समधी अवस्थेत गीता ग्रंथाची ज्ञानप्राप्ती झाली होती. नास्ट्रोडॅमस नामक भविषवेत्त्याने एका गोलात संपूर्ण जगाचे भविष्य पाहिले असे म्हणतात. ते त्याने काव्यरूपात मांडले. मात्र भारतीतील तत्कालीन ऋषी, मुनी यांनी वर्तमान आणि भविष्यातील समाज व्यवस्थेवर भाष्य केले होते. केवळ भाष्यच न करता समाजाला उदभवणाऱ्या समस्या आणि उपाययोजना त्यात सांगितल्या आहे, असे त्यांनी प्रवचनात सांगितले. यावेळी शेकडो श्रोतावर्ग उपस्थित होता.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The principles of the Gita guide the life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.