शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

तुरीचे भाव घसरले; बाजारात आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:07 IST

विदर्भाच्या विविध भागात कपाशीसोबत आंतर पीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. यंदा कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला. उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत तुरीला चांगला भाव राहिल, अशा आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना फटका : रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नातही घट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भाच्या विविध भागात कपाशीसोबत आंतर पीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. यंदा कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला. उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत तुरीला चांगला भाव राहिल, अशा आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला आहे. तुरीचे भाव घसरल्याने सेलू, हिंगणघाट, वर्धा आदी बाजारपेठेत तुरीची आवक वाढली आहे. सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी तुरीला ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रूपये भाव देण्यात आला. बाजार समितीत एकदम आवक वाढल्याने भाव मंदावले आहे. अशी स्थितीतही शेतकरी आपला शेतमाल विकण्यावर भर देत आहे. हिंगणघाटही कापूस व तुरीची मोठी बाजारपेठ असून हिंगणघाटच्या बाजारपेठेत बुधवारी तुरीला ५ हजार २०१ रूपये भाव देण्यात आला.वर्धा जिल्ह्यात काही भागात शेतकरी तुरीची सलग लागवड करतात. त्यामुळे त्यांना उत्पन्नाची आशा होती. मात्र यावर्षी उत्पादन घटल्याने अनेकांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. राज्यसरकारने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यासाठी फार व्यवस्था केलेली नाही. याच्या नोंदणीला मुदतवाढ दिली असली तरी अनेक शेतकरी थेट बाजारपेठेतच तूर विक्रीसाठी आणून व्यापाऱ्यांना ती देत आहेत. काही शेतकºयांना नगदी चुकारे मिळाले असून काही शेतकºयांनी तूर बाजार समितीच्या तारण योजनेत ठेवलेली आहे. शेतमाल साठवणूकीसाठी सर्व शेतकºयांकडे व्यवस्था नसल्याने कापूस, तूर, सोयाबीन या शेतमालाची तात्काळ विक्री करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे व्यापारी देईल तो भाव अशी अवस्था शेतकºयांची झाली आहे. बाजारात आवक वाढल्याने भाव पडले आहेत. कापसाची ही अशीच अवस्था झाली आहे.