शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला किंमत, शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यावी ! मात्र कोणत्याच जाहीरनाम्यात मुद्दा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 17:20 IST

Wardha : जिल्ह्यातील बळीराजाची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्हा प्रामुख्याने कपाशीसह सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. मात्र हिंगणघाट वगळता जिल्ह्यातील एकाही तालुक्यात शेतमालावर आधारित उद्योग उभारणी झाली नाही. बोटावर मोजण्याएवढे शेतकरी सोडले तर फळबाग लागवडीचे धाडस कोणी करत नाही. कारण बाजारपेठेत त्यांच्या मालाला किंमत नाही. जिल्ह्यात शेतकऱ्यांची अवस्था गंभीर असून, शेतमालाला किंमत अन् शेतीला प्रतिष्ठा मिळणार कधी? हे कोडे अजूनही उलगडले नाही.

परदेशात शेतमाल पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काहीअंशी यशही आले. मात्र किती शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे, हे मात्र माहिती नाही. जिल्ह्यात दूध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यासाठी सेवाग्राम एमआयडीसीत मोठा प्लांटही उभारण्यात आला. तेथे खरेदीही सुरु आहे. मात्र पॅकेजिंग करून अद्यापही दूध बाहेर पाठविण्यात आले नाही. शासन शेतकऱ्यांचा माल स्वतःहून परदेशात पाठवून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवून देऊ शकते. परंतु असे होत नाही आणि हा मुद्दा कोणाच्याही जाहीरनाम्यात नाही, ही शेती व शेतकऱ्यांसाठी शोकांतिका आहे. ज्या जिल्ह्यातून शेतपाणंद रस्त्याच्या योजनेला सुरुवात झाली ती योजना याच जिल्ह्यात बारगळली आहे. जिल्ह्यातून मोठे महामार्ग झाले. रेल्वेला गती मिळाली मात्र जिल्ह्यातील पाणंद रस्ते मात्र दुर्लक्षितच राहिले. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना खते, हमीभाव, पीककर्ज, शेतमालाची खरेदी-विक्री, वीज आदींसाठी अजूनही झगडावे लागत आहे. 

"शासनाने शहरासह गावातून जाणाऱ्या मार्गाला प्राधान्य देत रस्ते सिमेंटीकरण केले. मात्र अजूनही शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते नाही. कित्येक वेळा शेतपाणंद रस्त्याची मागणी केली मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहिले आहे." - पंढरीनाथ ढगे, धोत्रा (रेल्वे) शेतकरी

"शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यात येते. मात्र निकषाच्या आडकाठी लावत योजनेचा लाभ मात्र दिला जात नाही. एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यास किमान वर्षभर तरी कार्यालयाचे खेटे खावे लागतात. ही वस्तुस्थिती गेल्या दहा वर्षात बदलली नाही." - प्रवीण वंजारी, सालोड(हिरापूर)

"हमीभावाची गॅरंटी नाय सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने हमीभाव जाहीरही केले. गतवर्षीच्या तुलनेत ५० ते १०० रुपये जास्त भाव देण्यात आला. मात्र त्या तुलनेत बियाणे, खते यात करण्यात आलेली दरवाढ आणि वाढत्या महागाईत वाढता उत्पादन खर्च बघता हा हमीभाव तुटपुंजा ठरतो. शिवाय खरेदी केंद्रावर हमीभाव मिळविण्यासाठी अटी-शर्ती लावण्यात येतात त्या वेगळ्या. याबाबत लोकप्रतिनिधीही कोणी बोलत नाही."- अविनाश भोयर, सालोड (हिरापूर) शेतकरी.

टॅग्स :farmingशेतीwardha-acवर्धाFarmerशेतकरी