पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर दबाव

By Admin | Updated: August 30, 2015 01:54 IST2015-08-30T01:54:39+5:302015-08-30T01:54:39+5:30

धगडगन येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी नरेश शिरोडे याच्या नातलगांकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर प्रकरण मागे घेण्याकरिता दबाब टाकण्यात येत असल्याचे म्हणत ...

Pressure on the victim's family | पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर दबाव

पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर दबाव

धगडबन येथील बलात्कार प्रकरण : नागरिकांचे ठाणेदारांना साकडे; कारवाईची मागणी
समुद्रपूर : धगडगन येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी नरेश शिरोडे याच्या नातलगांकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर प्रकरण मागे घेण्याकरिता दबाब टाकण्यात येत असल्याचे म्हणत गावकऱ्यांनी शनिवारी ठाणेदारांना निवेदन सादर केले. या प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली
पीडित युवतीच्या परिवारातील सदस्यांना खोट्या गुन्ह्याखाली अडकविण्याची धमकी देण्यात येत आहे. यामुळे गावात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून ठाणेदार आर.टी. चव्हाण यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
गेल्या बुधवारी नरेश शिरोडे याने अल्पवयीन मुलीवर धगडबन शिवारात जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला होता. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिसांनी तत्परता दाखवित नराधम नरेश याला तत्काळ अटक केली. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी मुलीच्या कुटुंबीयांसह धगडबन येथील नागरिकांना खोट्या बलात्काराची तक्रार दाखल करून अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. आरोपीचे वडील, आई व पत्नी पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर तक्रार मागे घेण्याकरिता दबाव आणत असल्याचाही आरोप आहे.
शनिवारी (ता. २९) माजी आमदार अशोक शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो पुरूष व महिलांनी ठाणेदारांना भेटून आरोपीला जामीन न देता कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवदेन देतेवेळी यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र लढी, सुभाष कुकडे, पांडुरंग फलके, नरेश शिंदे, दीपक धोटे, सचिन धोटे, श्यामराव पोटे, प्रितम जोगे यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी
या प्रकरणातील आरोपीच्या परिवारातील सदस्यांकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना व त्यांना सहकार्य करणाऱ्या गावकऱ्यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देण्यात येत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे सदर नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Web Title: Pressure on the victim's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.