President Ram Nath Kovind arrives at Sevagram | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सेवाग्राम येथे आगमन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सेवाग्राम येथे आगमन

ठळक मुद्देमुख्यमंत्र् यांसह अनेक मंत्री व नेत्यांची मांदियाळी

दिलीप चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम/ वर्धा:

राष्ट्रपती कोविंद यांनी बापूकुटीला भेट देऊन आश्रम परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सूतकताई केंद्रालाही भेट देऊन आस्थेने चौकशी केली. राष्ट्रपतींच्या कुटुंबियांनीही आश्रमातील कार्यक्रमांची व उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी येथील संदेशपुस्तिकेत त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात संदेश लिहिला. त्यात त्यांनी आपणांस सेवाग्रामला येण्याची संधी मिळाली हे भाग्याचे मानतो. हे स्थान देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे स्थान आहे. देशाच्या शांती, प्रगती व समृद्धीसाठी नागरिकांनी सेवाग्राम आश्रम व गांधीजींच्या विचारांचे आचरण करावे, हे विचारच आपला मार्ग प्रकाशमान करतील असे त्यात त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: President Ram Nath Kovind arrives at Sevagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.