वाचन व चिंतनातूनच स्पर्धा परीक्षेची तयारी
By Admin | Updated: March 1, 2016 01:33 IST2016-03-01T01:33:01+5:302016-03-01T01:33:01+5:30
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर सातत्याने वाचन, चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे.

वाचन व चिंतनातूनच स्पर्धा परीक्षेची तयारी
प्रफुल्ल पाटील : महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयात व्यक्तीमत्व विकास व स्पर्धा परीक्षा कार्यशाळा
कारंजा(घा.) : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर सातत्याने वाचन, चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. सोबतच वृत्तपत्रातील अग्रलेख बारकाईने वाचा, पाचवी ते बारावी पर्यंतच्या शालेय पुस्तकांचा सखोल अभ्यास करा असा सल्ला प्रा. प्रफुल्ल पाटील यांनी दिला.
कारंजा येथे महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाद्वारे आयोजित एकदिवसीय व्यक्तीमत्व विकास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत प्रमुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण विद्यार्थी बुद्धीमत्तेने शहरी विद्यार्थ्यापेक्षा कमी नाहीत. त्यांना केवळ संधी उपलब्ध करून देवून योग्य दिशा देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. ही कार्यशाळा अ. भा. गुरुदेव सेवामंडळाच्या सभागृहात प्रा. डॉ. सुनील पखाले यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य प्रा. रामचंद्र ठोंबरे आणि दिलीप मानकर यांच्या उपस्थितीत सदर कार्यशाळा घेण्यात आली. व्यक्तीमत्व विकास कसा साधता येईल या विषयावर मार्गदर्शन करताना प्राचार्य ठोंबरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. जुन्या गैरसमजुती आणि समाजमान्यता पुसून टाकून, नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. संवाद साधताना गोड बोला, हळू बोला, कमी बोला आणि विचारपूर्वक बोला, शक्यतोवर रागाने बोलणे टाळा, पुस्तकांना मित्र बनवा यातूनच तुमचा व्यक्तीमत्व विकास साधल्या जाईल. असे त्यांनी सांगितले. प्राचार्य पखाले यांनी ‘वाचाल तर वाचाल’ हा कानमंत्र दिला. १०० विद्यार्थी या शिबिरात उपस्थित होते. वाचनालयाचे सचिव प्रा. अरुण कांबळे यांनी प्रास्ताविकातून पाहुण्याचा परिचय करून देत कार्यशाळेचे उद्दिष्ट समजावून सांगितले. संचालन अंकूश खडतकर यांनी केले. आभार गं्रथपाल रमेश चाफले यांनी मानले. यशस्वीतेकरिता किशोर कडमधाड, चेतन नासरे, प्रभाकर बरगट, पळसराम जसुतकर, अंकीत, विजय बारई यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)