शिंदुल्यांच्या झांज्यांची प्रथा आश्रमात आजही कायम

By Admin | Updated: May 30, 2016 01:48 IST2016-05-30T01:48:34+5:302016-05-30T01:48:34+5:30

मातीपासून तयार झालेल्या बापुकूटीच्या भिंतीला पावसाच्या पाण्याचा मारा बसू नये याकरिता ...

The practice of Shantul's songs is still retained in ashram | शिंदुल्यांच्या झांज्यांची प्रथा आश्रमात आजही कायम

शिंदुल्यांच्या झांज्यांची प्रथा आश्रमात आजही कायम

पावसापासून बापुकूटीच्या संरक्षणाची तयारी : मातीच्या भिंतीला बांधल्या जात आहेत झांज्या
सेवाग्राम: मातीपासून तयार झालेल्या बापुकूटीच्या भिंतीला पावसाच्या पाण्याचा मारा बसू नये याकरिता पूर्वीपासूनच शिंदुल्याच्या पानांपासून तयार करण्यात येत असलेल्या झांज्या लावण्याची प्रथा आहे. पावसाच्या पाण्यापासून इमारत बचावाकरिता अनेक अत्याधुनिक वस्तू बाजारात आल्या असताना सेवाग्राम आश्रमात आजही ही प्रथा जपल्या जात आहे. आजही या शिंदुल्याच्या पाण्याच्या झांज्या लावून पावसापासून बापुकूटीच्या भिंतीचे संरक्षण सुूर आहे.
बापुकूटी संपूर्ण देशाकरिता पे्ररणास्थान असल्याने येथे देशविदेशातील विचारवंत व पर्यटक येतात. आश्रमातील स्मारके माती व कुडाचे असल्याने पावसाच्या पाण्याचा मारा बसून या भिंतीना नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. आश्रमात महात्मा गांधी वास्तव्यास असताना भिंतीच्या संरक्षणाकरिता शिंदुल्यांच्या झांड्या लावल्या होत्या. तेव्हापासून ही प्रथा आजही जपली जात आहे. दर वर्षी लावलेल्या झांज्या काढून त्या सुरक्षित ठेवत पुढच्या वर्षी वापरण्यात येतात. तर ज्या खराब झाल्या त्या नष्ट करून नव्याने दुसऱ्या तयार करण्यात येतात. आश्रमात आदी निवास, बा व बापुकूटी, बापू दप्तर, आखरी निवास, रसोडा आदी स्मारके आहेत. यातील आखरी निवास व रसोडा वगळता सर्व स्मारके माती, कुंड, बांबू आदी साहित्यापासून बनविण्यात आलेल्या आहेत. पावसाळ्यात या भिंतींना धोका असतो. यामुळे त्यांच्या रक्षणासाठी शिंदूल्यांच्या झांड्या तयार करून भिंतीना लावण्याची परंपरा होती. या भागात मोठ्या प्रमाणात शिंदूल्याचे जंगलच असल्याने बापूंच्या काळापासूनच झांड्या लावण्याला प्रारंभ झाला होता. आज शिंदुल्यांच्या झाडांचे प्रमाण कमी झाले शिवाय त्या पाण्यापासून झांज्या तयार करणारे कारागिर मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याने सांगण्यात येत आहे. करंजी, पुजई नाही तर रामटेक येथून पानं आणून त्याच्या झांज्या तयार करण्यात येत आहे. पावसापूर्वीच कामाला प्रारंभ झाला असून पहिले बापुकूटी व बापू दप्तरला झांज्या लावण्यात येत आहे.(वार्ताहर)

साहित्य मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न
पूर्वीच्या तुलनेत आज असे साहित्य मिळविणे कठीण झाले आहे. शिंदुल्याचे जंगल कमी झाल्याने पाने मिळत नाही. यामुळे बाहेर जिल्ह्यातून ही पाने मागवावी लागत आहेत. मात्र नैसर्गिक पद्धत जपण्याची आश्रमाची प्रथा मोडणे शक्य नाही. यामुळे अनेक प्रयत्नांती साहित्य मिळविण्यात येते.

Web Title: The practice of Shantul's songs is still retained in ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.