पुस्तकांत इतरांना नतमस्तक करण्याची ताकद

By Admin | Updated: April 14, 2016 02:53 IST2016-04-14T02:53:27+5:302016-04-14T02:53:27+5:30

पुस्तकांमध्ये इतरांना आपल्यासमोर नतमस्तक करण्याची ताकद आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुस्तकांवर प्रेम करून वाचणाची आवड जोपासली पाहिजे,...

The power of humbling others in the books | पुस्तकांत इतरांना नतमस्तक करण्याची ताकद

पुस्तकांत इतरांना नतमस्तक करण्याची ताकद

माधुरी झाडे : कोमल मूनच्या ‘मी सावित्री बोलते’ प्रयोगाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
वर्धा : पुस्तकांमध्ये इतरांना आपल्यासमोर नतमस्तक करण्याची ताकद आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुस्तकांवर प्रेम करून वाचणाची आवड जोपासली पाहिजे, असे मत डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाच्या अधिव्याख्याता प्रा. डॉ. माधुरी झाडे यांनी व्यक्त केले.
स्थानिक नागरी बँक कॉलनीत नवयुवक भीमोदय समितीतर्फे आयोजित भीम महोत्सव २०१६ मध्ये महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त स्त्री स्वातंत्र्याचे प्रणेते राष्ट्रपिता जोतिराव फुले या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मराज धवणे उपस्थित होते. त्यानंतर मी सावित्री बोलते हा एकपात्री प्रयोग कोमल मून या विद्यार्थिनीने सादर केला. त्यानंतर आई नावाची हृदयस्पर्शी नाटिका उर्वशी डेकाटे, सायरी चांडक, तेजश्री कुकडे, भूषणी कडू या विद्यार्थिनीनी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रज्वल थूल, प्रास्ताविक डॉ. प्रदीप थूल तर आभार जिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रकाश कांबळे, राहुल कांबळे, मनीष कांबळे, राहुल तेलंग, सचिन तेलंग, स्वप्नील लोहवे, राहुल गाडगे, संदीप तामगाडगे, सचिन वागदे आदी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)

आर.के. हायस्कूल
पुलगाव : स्थानिक आर. के. हायस्कूल येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका पी. बी. नकाशे, उपमुख्याध्यापक अरविंद येंडे, पर्यवेक्षक संजय सहारे, पर्यवेक्षिका माया वंडलकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी महात्मा फुले यांच्याविषयी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन भोयर यांनी केले. आभार आनंद जीवने यांनी मानले.
स्वामी विवेकानंद मानवसेवा बहुउद्देशीय संस्था
वर्धा- येथील स्वामी विवेकानंद मानवसेवा बहुउद्देशीय संस्थेद्वारे क्रांतिसूर्य जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. योगेंद्र कोलते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी वनिता वाघमारे उपस्थित होत्या. ‘गोरगरीब आणि सामान्यांच्या उत्कर्षासाठी जगले महात्मा फुले, त्यांच्याच उज्ज्वल कार्यामुळे शिकतात आज ही मुले असा संदेश अध्यक्षांनी दिला. वनिता वाघमारे यांनीही महात्मा फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. यशस्वीतेसाठी संस्थेचे अधीक्षक प्रशांत मुळे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रज्ञा ब्राम्हणकर, क्षेत्रकार्य अधिकारी नीलेश मांडवगडे यांचे सहकार्य लाभले. संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रंजना खोब्रागडे यांनी केले. उपस्थितांचे आभार शीला दाहीर यांनी मानले.

Web Title: The power of humbling others in the books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.