शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘पोथरा’च्या पाण्याची पळवा-पळवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:32 PM

तालुक्यात पोथरा प्रकल्प १९७९-८१ मध्ये तयार करण्यात आला. आपल्यालाच या प्रकल्पाचा फायदा होईल या आशेनच या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन सदर प्रकल्पासाठी दिली. परंतु, सध्या या प्रकल्पाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिल्या जात असल्याने हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह शेतकºयांसाठी शोभेची वास्तूच ठरत आहे.

ठळक मुद्देचंद्रपूरला दिले जातेय पाणी : नागरिकांसह शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यात पोथरा प्रकल्प १९७९-८१ मध्ये तयार करण्यात आला. आपल्यालाच या प्रकल्पाचा फायदा होईल या आशेनच या भागातील शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन सदर प्रकल्पासाठी दिली. परंतु, सध्या या प्रकल्पाचे पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिल्या जात असल्याने हा प्रकल्प वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह शेतकºयांसाठी शोभेची वास्तूच ठरत आहे.पोथरा प्रकल्पासाठी खापरी, सुकळी, बर्फा, रुणका, झुणका, निंभा या गावांमधील शेतकºयांच्या शेजजमिनी काहींनी स्वखुशीने दिल्या. तर काही शेतकºयांवर जमीन अधिग्रहण करताना दबावतंत्राचाच वापर करण्यात आला होता. असे असले तरी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ३० वर्षांचा कालावधी लोटून करण्यात आले नाही. शिवाय जमिनीचा संपूर्ण मोबदलाही देण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात येते. प्रकल्पासाठी शेतजमिनी अधिग्रहित करताना अल्पमोबदलाच देण्यात आला. त्यावेळी १५ ते २० हजार रुपये एकरी मोबदला तसेच त्या शेतकºयांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी असे धोरण राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र केवळ आठ ते दहा शेतकºयांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. अनेक शेतकºयांना या धोरणाच्या लाभाची प्रतीक्षा आहे. जलाशय वर्धा जिल्ह्यात आणि सर्वाधिक फायदा चंद्रपूर जिल्ह्याला होत असल्याने शेतकºयांसह नागरिकांमध्येही रोष निर्माण होत आहे. त्यामुळे शासनानेही शेतकरी हितार्थ धोरण राबविण्याची मागणी आहे.गाळमुक्त धरण योजना ठरली फोलसदर धरणात मागील ३५ वर्षांपासून पोथरा नदीच्या प्रवाहाने वाहत येणारा गाळ दरवर्षी जमा होत गेल्याने सध्या हे धरण उथळ झाले आहे. शिवाय धरणाच्या पाणी साठवण क्षमता सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही या प्रकल्पाला शासनाच्या गाळमुक्त धरण योजनेच्या माध्यमातून गाळमुक्त करण्यासाठी कुठलेही पाऊल टाकले जात नसल्याने ही योजना येथे फोल ठरत आहे. शिवाय तशी चर्चाही परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे. इतकेच नव्हे तर पावसाळ्याच्या दिवसात धरणातून पाणी सोडले जात असल्याने याचा आर्थिक फटका पोथरा नदी जवळील गावांमधील नागरिकांना सहन करावा लागत आहे.लाभापेक्षा नुकसान जास्तप्रकल्पग्रस्ताच्या सुपीक जमिनी कवडीमोल भावाने धरणात गेल्याने त्यांनी हिंगणघाट व समुद्रपूर येथे जाऊन रोजमजुरी करून कुटुंबाचा गाढा ओढावा लागत आहे. शिवाय त्यांना सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा प्रकल्प लाभदायक ठरण्यापेक्षा जास्त नुकसानदायकच ठरत असल्याची ओरड शेतकºयांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंगसदर प्रकल्प आपल्याला आधार देईल अशी अपेक्षा या भागातील शेतकºयांना होती. परंतु, मागील काही वर्षांपासून या प्रकल्पातील पाणी चंद्रपूर जिल्ह्याला दिले जात आहे. विशेष म्हणजे त्याकडे येथील स्वयंघोषित व्हॉईट कॉलर नेते तसेच काही राजकीय पुढाºयांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे चंद्रपूरचे पुढारी येथील शेतकऱ्यांच्या साधेपणाचा फायदातर घेत नाही ना, असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकल्पातील पाणी परिसरातील ग्रामस्थांना पिण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्यास भविष्यातील जलसंकटावर मात करता येऊ शकते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.