पोथरा वसाहतीची दुरवस्था

By Admin | Updated: April 16, 2016 01:37 IST2016-04-16T01:37:39+5:302016-04-16T01:37:39+5:30

सुमारे ३० वर्षांपूर्वी पोथरा धरण परिसरात कर्मचाऱ्याच्या निवासाकरिता वसाहत निर्माण करण्यात आली.

Pothra Colonial Disaster | पोथरा वसाहतीची दुरवस्था

पोथरा वसाहतीची दुरवस्था

कर्मचारी अडचणीत : वसाहतीसाठी निधीच नसल्याचे वास्तव
नारायणपूर : सुमारे ३० वर्षांपूर्वी पोथरा धरण परिसरात कर्मचाऱ्याच्या निवासाकरिता वसाहत निर्माण करण्यात आली. पण शासकीय उदासीनतेमुळे सध्यस्थितीत या वसाहतींनी अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे राहात असलेले कर्मचारी अत्यंत अडचणींचा सामना करेत आहे.
सुमारे पाच एकर परिसरात सदर वसाहतीचे बांधकाम करण्यात आले होते. या वसाहतीत निवासस्थान, गोदाम, सभागृह, विश्रामगृह आंदींचीही व्यवस्था आहे. पण गत तीन ते चार वर्षांपासून अधीकाऱ्याच्या दुर्लक्षितपणामुळे वसाहतीवर अवकळा आली आहे. विशेष म्हणजे सदर धरण परिसरातील वसाहत असतानाही येथे पाण्याची व्यवस्था नाही. विजेचा पत्ता नाही. येथे असलेली विहीर कोरडीठाक झाली आहे. पथदिवे शोभेचे झाले आहे. वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरून पाणी आणावे लागते. येथील विश्रामगृह तर पूर्णत: गवत व कचऱ्याने झाकून गेले आहे. याबाबत वसाहत प्रमुख धोटे यांनी विचारले असता सदर कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले.(वार्ताहर)

पाण्यासाठी वणवण
धरणावर काम करीत असलेल्या कर्मचारी वर्गासाठीच सदर वसाहत बांधण्यात आली आहे. पूर्वी येथे सर्व सोयी उपलब्ध होत्या. पण देखभालीची कुठलीही व्यवस्था नसल्याने तसेच त्यासाठी कुठल्याही निधीची तरतूद विभागाद्वारे करण्यात येत नसल्याने आज ही वसाहत भकास झाली आहे. विशेष म्हणजे धरण परिसरात ही वसाहत असतानाही येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Web Title: Pothra Colonial Disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.