डाक विभागाला रिक्तपदांचे ग्रहण
By Admin | Updated: May 18, 2016 02:13 IST2016-05-18T02:13:23+5:302016-05-18T02:13:23+5:30
आता सर्वच व्यवहार आॅनलाईन होत आहे. या काळात कधी संदेशवहनाचा कणा असलेला डाक विभाग नव्या योजना आणत कात कात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे.

डाक विभागाला रिक्तपदांचे ग्रहण
संदेश वहनाचा कणा ढासळतोय : जिल्ह्यात ३६७ डाकघरातून चालतो कारभार
गौरव देशमुख वर्धा
आता सर्वच व्यवहार आॅनलाईन होत आहे. या काळात कधी संदेशवहनाचा कणा असलेला डाक विभाग नव्या योजना आणत कात कात टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या विभागात सर्वत्र रिक्तपदांची संख्या अधिक असल्याने या विभागाला गतवैभव प्राप्त होते अथवा नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे. वर्धा जिल्ह्यात डाक विभागातील तब्बल ११७ पदे रिक्त आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.
सर्वत्र ई-मेल व मोबाईलच्या काळात संदेश वहनाची पद्धत सोपी झाली आहे. क्षणात आॅनलाईन संदेश आवश्यक असलेल्या व्यक्तीला मिळतो. यामुळे डाक विभागाचे ग्राहक कमी होत आहे. कधी संदेशवहनाची सर्व जबाबदारी एकट्या डाक विभागावर होती. कच्च्या पक्क्या रस्त्याने सायकलवर खाकी कपडे घातलेला पोस्टमन दिसला की प्रत्येक जण त्याला ‘आपले काही आहे का’ असा सवाल करीत होते. यात तोही असल्यास तिथेच पत्र देवून मोकळा होत होत होता. आता मात्र तसा पोस्टमन दिसतच नसल्याचे चित्र आहे. आज याच टपाल विभागाला रिक्तपदांनी ग्रासले आहे.
कधी खाकी वर्दीतील पोस्टमन आता दोन रंगात करण्यात आला आहे. यात आकाशी रंगाचा वापर करण्यात येत आहे. गणवेश बदलले तरी त्यांचे काम मात्र तेच आहे. सर्वसामान्यांशी जोडल्या गेलेल्या या टपाल विभागाला अपडेट करण्याचा डाक विभागाचा प्रयत्न असला तरी आजच्या घडीला रिक्त पदांमध्ये याच पोस्टमनची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. त्याची संख्या ९५ एवढी आहे. शहरी भागातील ३५ तर ग्रामीण भागात ६० पदे रिक्त आहेत. यामुळे अनेकांना व्यवहाराकरिता आवश्यक असलेली कागदपत्रे डाक विभागाच्या याच टपाल खात्यामार्फत मिळत असल्याचे दिसून आले आहे.