सरपंच पदावर काटकर यांची वर्णी
By Admin | Updated: January 14, 2016 02:45 IST2016-01-14T02:45:28+5:302016-01-14T02:45:28+5:30
स्थानिक ग्रा.पं. च्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या प्रवीण काटकर यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे.

सरपंच पदावर काटकर यांची वर्णी
अविश्वासाने पद होते रिक्त : बुधवारी पार पडली निवडणूक
वायगाव (नि.) : स्थानिक ग्रा.पं. च्या रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपच्या प्रवीण काटकर यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. काटकर यांना १२ मते मिळाली तर प्रतीस्पर्धी उमेदवाराला केवळ पाच मते प्राप्त करता आली.
७ डिसेंबर रोजी सरपंच गणेश वांदाडे यांच्यावरील अविश्वास ठराव पारित झाल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले. सरपंच पदाची निवडणूक बुधवारी घेण्यात आली. यात सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत निवडणूक अर्ज सादर करण्यात आले. तीन उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. यात उषा गुलाबराव नागपुरे, प्रवीण गोविंदराव काटकर व बाबा कृष्णाजी घोडे यांचा समावेश होता. घोडे यांनी नामांकन मागे घेतल्याने रिंगणात दोन उमेदवार राहिले. हात उंचावून सरपंच पदाची निवड करावयाची होती. यात उषा नागपुरे या अपक्ष उमेदवारांना पाच मते मिळालीत. प्रवीण काटकर यांना भाजपची सात, बसपाची दोन व काँगे्रसच्या तीन उमेदवरांनी मतदान केले. बारा मते मिळाल्याने काटकर यांना सरपंच जाहीर करण्यात आले. निवडणूक अधिकारी म्हणून पं.स. वर्धाचे विस्तार अधिकारी शंकर हाते तर सहायक म्हणून ग्रामविकास अधिकारी वामन वाटकर यांनी काम पाहिले.(वार्ताहर)