आर्वीत वंचितांना मिळतोय शिवभोजनाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:15+5:30
राज्यात संचारबंदी असल्याने बाहेरगावातील विद्यार्थी, स्थलांतरित मजूर, रस्त्यावरील बेघर तसेच गरजू गरीब लोकांचे जेवणाअभावी हाल होत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक तालुक्यात शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आर्वीतही तालुकास्तरीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. पाच रुपयांत मिळणाºया या शिवभोजन थाळीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी, एक वाटी भात व एक वाटी वरण दिले जाणार आहे.

आर्वीत वंचितांना मिळतोय शिवभोजनाचा आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने आर्वीच्या बसस्थानकासमोरील दीप रेस्टॉरेंटमध्ये तालुकास्तरीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे. गुरुवारपासून या केंद्रावर दररोज सर्वप्रथम येणाऱ्या १०० लाभार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत पाच रुपयांत भोजन दिले जाणार आहे.
राज्यात संचारबंदी असल्याने बाहेरगावातील विद्यार्थी, स्थलांतरित मजूर, रस्त्यावरील बेघर तसेच गरजू गरीब लोकांचे जेवणाअभावी हाल होत आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक तालुक्यात शिवभोजन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आर्वीतही तालुकास्तरीय शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. पाच रुपयांत मिळणाºया या शिवभोजन थाळीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी, एक वाटी भात व एक वाटी वरण दिले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता या कें द्रावर ग्राहकांना हॅण्डवॉश, साबन उपलब्ध करून देणे, भोजनालय दररोज निर्जंतुकीकरण करणे, शिवभोजनातील सर्व भांडी निर्जंतुकीकरण करणे व सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे तसेच भोजनालयाच्या चालकाने प्रत्येक ग्राहकाला किमान तीन फुट अंतरावर जेवणास बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ आर्वी तालुक्यातील स्थलांतरित मजूर, आर्वी येथे शिक्षणाकरिता आलेले विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर व्यक्ती यांनी या शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी केले आहे. या केंद्राच्या प्रारंभाप्रसंगी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, मुख्याधिकारी विद्याधर अंधारे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे, नायब तहसीलदार विनायक मगर, निरीक्षण अधिकारी सीमा महल्ले, पुरवठा निरीक्षक अमोल पाटील तसेच कर्मचारी उपस्थित होते.