कठड्याअभावी पूल धोक्याचा

By Admin | Updated: December 28, 2015 02:39 IST2015-12-28T02:39:17+5:302015-12-28T02:39:17+5:30

धुनिवाले चौकात नागपूरकडे जात असलेल्या मार्गावरील पुलावर मोठे कठडे नसल्याने हा पूल धोक्याचा ठरत आहे.

Poor risk of fire brigade | कठड्याअभावी पूल धोक्याचा

कठड्याअभावी पूल धोक्याचा

वर्धा : धुनिवाले चौकात नागपूरकडे जात असलेल्या मार्गावरील पुलावर मोठे कठडे नसल्याने हा पूल धोक्याचा ठरत आहे. येथील पुलाला असलेले कठडे खूपच लहान असल्याने आणि आसपासचा भाग हा उताराचा असल्याने अपघाताची दाट शक्यता असते.
काहीच दिवसांपूर्वी दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी दुचाकीसह या नाल्यात कोसळल्या. यात त्यांना बरीच दुखापत झाली. त्यामुळे येथे असलेला धोका पुन्हा एकदा प्रशासनाच्या निदर्शनास आला. नागपूरकडे जात असलेल्या प्रवाश्यांची या मार्गावर सतत वर्दळ असते. तसेच धुनिवाले चौक हा या परिसरातीलमुख्य चौक आहे. अनेक व्यापारी प्रतिष्ठांने या परिसरात आहे. सोबतच अनेक महाविद्यालये येथून जवळ असल्याने बसेसचा थांबाही येथे देण्यात आला आहे. विशेष म्हणजे येथील नाल्यावर असलेल्या मोठ्या पुलाच्या लगतच प्रवासी निवारा आहे. मार्गावर भरधाव वाहने धावत असतात. त्यामुळे या नाल्याजवळ गतिरोधक तयार करण्यात आले. नागपूरकडे जाताना या गतिरोधकाच्या डाव्या बाजुची जागा ही खोल आहे. त्यामुळे गतिरोधक चुकविण्याच्या नादात वाहने सरळ नाल्यात जातात. त्यामुळे या नाल्यावरील कठडे उंच करण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Poor risk of fire brigade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.