शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

महामार्गाच्या पाण्याने शेताचे झाले तळे

By admin | Updated: June 25, 2015 02:09 IST

गत दोन-तीन दिवस एकसारखा पाऊस सुरू होता. महामार्गावरील पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी दुतर्फा नाल्या काढल्या आहेत; ...

शेतकरी व नागरिक त्रस्त : नाल्या असमर्थ ठरल्याने ले-आऊटमध्येही पाणीच पाणीतळेगाव (श्या.पं.) : गत दोन-तीन दिवस एकसारखा पाऊस सुरू होता. महामार्गावरील पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी दुतर्फा नाल्या काढल्या आहेत; पण त्या सदोष आहेत. त्यांची टोके मुख्य नालीत काढण्यात आली नाहीत. यामुळे नालीचे पाणी शिरून परिसरातील शेतांना रात्रभरात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. या प्रकारामुळे पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. मार्गालगतच्या ले-आऊटमध्येही सर्वत्र पाणी साचले आहे.तळेगाव ते खडका दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. तळेगाव ते गुरूदेव सॉ- मिलपर्यंत ओरिएंटल कंपनीने रस्त्याचे चौपदरीकरण केले तर चिस्तूर ते खडकापर्यंतचे काम आरआयबी कंपनीने केले. महामार्गावरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी दुतर्फा नाल्या खोदण्यात आल्या. गावालगत भूमिगत नाल्या करण्यात आल्या आहेत. याच नाल्यालगत पुन्हा केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. यामुळे त्या नाल्या बुजल्या आहेत. नाल्या बुजल्याने पावसाचे पाणी थेट लगतच्या शेतात शिरत. शिवाय भूमिगत नाल्यांचे छिद्र बुजल्याने रस्त्यालगतच्या ले-आऊटमध्येही डबके साचले आहे. तळेगाव ते खडका दरम्यान पहिल्याच पावसात अनेक शेतात व ले-आऊटमध्ये पाणी शिरल्याने तळे साचले आहे. ही स्थिती कायम राहिल्यास शेतात पिके घेणे कठीण होणार आहे. मुळात महामार्गाच्या दुतर्फा केबलसाठी नाल्या खोदल्याने पाणी वाहून जाण्याकरिता असलेल्या नाल्या बुजणार नाही, याची काळजी महामार्ग विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांवर बिकट प्रसंग ओढवला आहे. किंबहुना महामार्गाची देखभाल दुरूस्ती करणाऱ्या दोन्ही कंपनीनेही केबलसाठी नाल्या खोदल्या जात असताना दुर्लक्ष केले. यामुळे शेतकऱ्यांवर सध्या ओढवलेल्या बिकट प्रसंगासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत या दोन्ही कंपन्या व केबलसाठी नाल्या खोदणारे कंत्राटदार तेवढेच जबाबदार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)दुतर्फा काढलेल्या नाल्या बुजल्या; भूमिगत नाल्याही ठरताहेत कुचकामीमहामार्गावर पडणारे पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी महामार्गाच्या दुतर्फा नाल्या काढण्यात आल्यात; पण त्या बुजल्या आहेत. यामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. नाल्याची टोके जवळच्या नाल्यामध्ये सोडणे महत्त्वाचे होते; पण तेही करण्यात आलेले नाही. यामुळे महामार्गावरील पावसाचे पाणी लगतच्या शेतात शिरून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे परिसरातील शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. शिवाय ले-आऊटमध्येही पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उपाययोजना गरजेच्यामहामार्गावरील पावसाच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात अधिक त्रास होण्याची शक्यता आहे.संततधार पावसामुळे शेतीची कामे रखडलीकारंजा (घा.) : तालुक्यात तीन ते चार दिवस संततधार पाऊस सुरू होता. या पावसामुळे अनेकांच्या शेतजमिनी जलमय झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. शिवाय जनजीवनही विस्कळीत झाले. पाऊस व विद्युल्लतेमुळे ३३ केव्हीचा वीज पुरवठा खंडित होऊन तालुक्यातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. सतत पाऊस सुरू असल्याने शेतातील कामेही खोळंबली होती. यानंतर दोन दिवस उघाड मिळाली; पण अनेक शेतांमध्ये पाणी असल्याने पेरणीची कामे प्रलंबित राहिलीत.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरण्या आटोपल्या होत्या. या शेतकऱ्यांना तीन दिवस आलेल्या संततधार पावसाचा फटका बसला. पेरलेले बियाणे उगविणार की नाही, अशी शंका शेतकरी उपस्थित करीत आहेत. दुबार पेरणीची वेळ तर येणार नाही ना, अशी शंका होती; पण मंगळवारी पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीला प्रथम प्राधान्य दिले आहे. पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामेही रखडली होती.(शहर प्रतिनिधी)