शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात राजकीय कार्यक्रमांना मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 04:24 IST

सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबत येथील जागेची पाहाणी करण्यात आली असली तरी, आश्रम परिसरात राजकीय कार्यक्रमांना मनाई असल्याने काँग्रेसने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे.

- अभिनय खोपडेवर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षांचे औचित्य साधून सेवाग्राम आश्रम परिसरात अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्याबाबत येथील जागेची पाहाणी करण्यात आली असली तरी, आश्रम परिसरात राजकीय कार्यक्रमांना मनाई असल्याने काँग्रेसने पर्यायी जागेचा शोध सुरू केला आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अशोक गहलोत आणि प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी सेवाग्राम परिसरातील जागांची पाहणी केली. मात्र सर्व सेवा संघ, आश्रम प्रतिष्ठान व नयी तालीम या संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या जागा राजकीय कार्यक्रमांसाठी देण्यात येत नाही. तसा ठराव आता नव्हे, तर स्वातंत्र्यपूर्व काळातच झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या बैठकीसाठी आवश्यक असलेली जागा आश्रमात उपलब्ध नाही, असे सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते आमदार रणजीत कांबळे म्हणाले की, आश्रम प्रशासनाने काँग्रेसला परवानगी नाकारलेली नाही. आश्रमात राजकीय कार्यक्रम घेता येत नाही, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आश्रमच्या बाहेर कार्यक्रम घेता येऊ शकतो. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व अशोक गहलोत यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून येथील बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराची व सभागृहाची पाहणी केली. मात्र येथे लीफ्टची व्यवस्था नसल्याने येथे कार्यकारिणीची बैठक घेण्यास अडचण निर्णय होत असल्याचे सांगण्यात येत आहे.यापूर्वीही नाकारले कार्यक्रमराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर १९९९ मध्ये पक्षाचे अधिवेशन घेण्यासाठी आश्रम प्रतिष्ठानकडे जागा मागण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी परवानगी दिली नव्हती. त्यांच्या घटनेत याबाबीची तरतूद आहे, अशी माहिती सुरेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.बैठक रद्द होण्याची शक्यतासेवाग्राम येथे १५० व्या गांधी जयंतीनिमित्त आश्रम प्रतिष्ठानचे पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेले आहेत. तर राज्य शासनाने ७ दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमासाठी आश्रमच्या बाहेर पण प्रतिष्ठानच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आश्रम परिसरात जागा उपलब्ध नसल्याने काँग्रेसची बैठक रद्द होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण