१.१७ लाख बालकांना पाजणार पोलिओची लस

By Admin | Updated: January 14, 2016 02:48 IST2016-01-14T02:48:14+5:302016-01-14T02:48:14+5:30

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा रविवार १७ जानेवारी तर दुसरा टप्पा २१ फेब्रुवारी रोजी आयोजित आहे.

Polio vaccine to be used for 1.17 lakh children | १.१७ लाख बालकांना पाजणार पोलिओची लस

१.१७ लाख बालकांना पाजणार पोलिओची लस

पल्स पोलिओ लसीकरण : १३३७ बुथ व ३ हजार २६७ कर्मचारी
वर्धा : पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा रविवार १७ जानेवारी तर दुसरा टप्पा २१ फेब्रुवारी रोजी आयोजित आहे. या मोहिमेकरिता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये, सहा ग्रामीण रुग्णालये, २७ प्राथमिक आरोग्य केंद्र व १८१ उपकेंद्रांद्वारे जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख १७ हजार ७७६ बालकांना पोलिओ डोज पाजण्यात येणार आहे.
रविवारी जिल्ह्यात १ हजार ३३७ बुथ अणि ३ हजार २६७ कर्मचाऱ्यांमार्फत पोलिओचा डोज देण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पर्यवेक्षणाकरिता २६७ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. १९ ते २१ जानेवारी या कालावधीत ग्रामीण भागात तर १९ ते २३ या कालावधीत शहरी भागात २ हजार ७६१ कर्मचारी गृहभेटी देऊन रविवारी बुथवरील मोहिमेतून सुटलेल्या बालकांना पोलिओ डोज देणार आहेत. या मोहिमेच्या पर्यवेक्षणाकरिता १६९ पर्यवेक्षकांची नियुक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ डोजपासून वंचित राहू नये, असे आवाहन जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Polio vaccine to be used for 1.17 lakh children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.