शाळा व शासकीय रुग्णालयात पोलिओ जनजागृती कार्यक्रम
By Admin | Updated: November 4, 2016 01:47 IST2016-11-04T01:47:22+5:302016-11-04T01:47:22+5:30
पोलिओ निर्मूलन उपक्रमात रोटरी क्लब गांधी सिटी यांच्यावतीने जनजागृती करण्यात आली.

शाळा व शासकीय रुग्णालयात पोलिओ जनजागृती कार्यक्रम
रोटरीचा उपक्रम : पोलिओ निर्मूलनाचा संकल्प
वर्धा : पोलिओ निर्मूलन उपक्रमात रोटरी क्लब गांधी सिटी यांच्यावतीने जनजागृती करण्यात आली. रोटरीद्वारे शाळा व शासकीय रुग्णालयात व्हिडीओ क्लिप दाखवून माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात डॉ. राजेंद्र बोरकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी रोटरी क्लब अध्यक्ष सुनीता इथापे, सचिव संगिता इंगळे, अर्चना चैनानी, वसंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक आखतकर, संगिता कापसे, सीमा साळवे, अर्चना बोकोर, वर्षा चरजे यांची उपस्थिती होती.
या उपक्रमातून पोलिओ कोणत्याही वयात होऊ शकतो. पाच वर्षाखालील मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. रोटरीने पोलिओ निर्मुलनासाठी पोलिओ प्लस हा लसीकरणाच्या माध्यमातून पोलिओ निर्मूलन करण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)