शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑन ड्यूटी’ हृदयविकाराचा झटका; पोलीस अंमलदाराचा मृत्यू

By चैतन्य जोशी | Updated: September 12, 2022 14:12 IST

मृत्यूने पोलीस विभाग शोकाकुल : रामनगर ठाण्यात होते कार्यरत

वर्धा : शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार रामहरी दिनकर शिरसाठ (३३) रा. तेलघाना ता. अंबेजोगाई जि. बीड यांना कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा १२ रोजी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची वार्ता पसरताच पोलीस विभागात शोकाकुल वातावरण होते.

पोलीस अंमलदार ब. नं. ८४७ रामहरी दिनकर शिरसाठ यांची २०१० मध्ये पाेलीस दलात नियुक्ती झाली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध पोलीस ठाण्यांत कर्तव्य बजावले. सध्या ते रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ते डायल ११२ या अत्याधुनिक वाहनातून गस्त घालीत असतानाच त्यांना ११ रोजी मध्यरात्री अचानक अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे ते आराम करण्यासाठी काही वेळासाठी घरी गेले. घरी आराम करीत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा पहाटे ५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, १५ महिन्यांचा मुलगा आणि ६ वर्षांची मुलगी असे ते वर्ध्यातील घरी राहत होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता माहिती होताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. रामहरी शिरसाठ यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पोलीस वाहनात आणण्यात आला. उत्तरीय तपासणी झाल्यावर त्यांचा मृतदेह पोलीस मुख्यालयात नेण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला पोलीस सलामी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या मुळ गावी तेलघाना जि. बीड येथे नेण्यात आला.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटकाwardha-acवर्धा