पोलिसांचे वाहन उलटले; पाच जखमी
By Admin | Updated: June 1, 2016 02:41 IST2016-06-01T02:41:46+5:302016-06-01T02:41:46+5:30
पुलगाव येथे बंदोबस्त करण्यासाठी जात असलेले कारंजा (घा.) पोलीस ठाण्याचे वाहन पलटी झाले.

पोलिसांचे वाहन उलटले; पाच जखमी
पुलगाव येथे बंदोबस्ताला जाताना अपघात
आकोली : पुलगाव येथे बंदोबस्त करण्यासाठी जात असलेले कारंजा (घा.) पोलीस ठाण्याचे वाहन पलटी झाले. यात पाच जण जखमी झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी झाला.
वाहन एम.एच. ३२ जे. ०१७१ ने कारंजा ठाण्याचे पोलीस पुलगावकडे बंदोबस्तासाठी जात होते. दरम्यान, मरकसूर ते बोरगाव (गोंडी) येथील घाटात वाहन पलटी झाले. या अपघातात पीएसआय प्रदीपकुमार नवलचंद राठोड, राजेश बाळापूरे, कैलास सोनोने, पूजा लोहकरे व चालक सुरेश चव्हाण हे पाच जण जखमी झाले. सदर घटनास्थळ खरांगणा (मो.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून पीएसआय विनोद राऊत, जमादार दिनेश गायकवाड व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत नोंद घेतली. जखमींना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.(वार्ताहर)