पोलीस अधीक्षक कार्यालयासह सावंगी व रामनगर येथील ठाण्याचे लोकार्पण
By Admin | Updated: December 19, 2015 02:04 IST2015-12-19T02:04:33+5:302015-12-19T02:04:33+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीसह नव्याने निर्माण झालेल्या सावंगी (मेघे) व रामनगर येथील ..

पोलीस अधीक्षक कार्यालयासह सावंगी व रामनगर येथील ठाण्याचे लोकार्पण
वर्धा : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीसह नव्याने निर्माण झालेल्या सावंगी (मेघे) व रामनगर येथील पोलीस ठाण्याचे लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला अतिथी म्हणून ना. राम शिंदे, खासदार रामदास तडस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष चित्रा रणनवरे, आ. अनिल सोले, आ. मितेश भांगडिया, आ. रणजित कांबळे, आ. पंकज भोयर, आ. अमर काळे, आ. समीर कुणावार, शिक्षक आ. नागो गाणार, नागपूर क्षेत्राच विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांची उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यक्रमानुसार सायंकाळी ४.३० वाजता सावंगी (मेघे) येथील पोलीस ठाणे, ४.४५ वाजता रामनगर पोलीस ठाणे व ५ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय मगर, यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)