शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पोलिसांचे वास्तव्य कोंडवाड्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:22 IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी २४ तास दक्ष राहून आपले कर्तव्य बजावणाºया पोलीस कर्मचाºयांची स्थानिक सिव्हील लाईन भागातील निवासस्थानांची दैनावस्था झाली आहे.

ठळक मुद्देप्राथमिक सुविधांचा अभाव : वरिष्ठांनी लक्ष देत कार्यवाही करण्याची गरज

आॅनलाईन लोकमतवर्धा : कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी २४ तास दक्ष राहून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाºयांची स्थानिक सिव्हील लाईन भागातील निवासस्थानांची दैनावस्था झाली आहे. या पोलीस वसाहतीत अनेक प्राथमिक सोयी-सुविधांचा अभाव असून त्याचा तेथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सिव्हील लाईन भागातील ज्या परिसरात सध्या पोलीस कर्मचारी राहत आहेत ती वसाहत दुर्लक्षीत कारभारामुळे कोंडवाडाच बनला आहे, हे उल्लेखनिय.सिव्हील लाईन भागातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहासमोर असलेल्या पोलीस वसाहतीत अनेक प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. या परिसरात अनेक ठिकाणी पक्के रस्ते नाही. शिवाय पक्क्या नाल्याही नाहीत. मोठाले दगड तुडवतच पोलीस कर्मचाºयांना व त्यांच्या कुटुंबियांना येथून ये-जा करावी लागत आहे. अनेक ठिकाणच्या नाल्या खचल्याने तसेच काही ठिकाणीच्या नाल्या कचºयामुळे बुजल्याने ठिकठिकाणी सांडपाणी गोळा होत आहे. सदर सांडपाण्याच्या डबक्यात डासांची निर्मिती होत असून रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या प्रकारामुळे तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शिवाय या वसाहतीतील प्रत्येक घर इंग्रजकालीन निर्मित असून सध्या ते जीर्ण झाल्याने व त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. अनेक घरात साधे इलेक्टीकचे बोर्डही नाहीत. तर बहूतांश घरावरील टिनपत्रे तुटली असल्याने पावसाळ्याच्या दिवसात छतातून पावसाचे पाणी थेट घरात शिरते. शिवाय या वसाहतीतील एकाही घरी अर्थिंग नसल्याचे सांगण्यात येते. प्रात:विधीकरिता पोलिसी वसाहत परिसरात सार्वजनिक शौचालय आहेत. परंतु, अनेक शौचालयांना झुडपांचा विळखा असल्याने आणि झुडपांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने घरातून शौचालयापर्यंतचा प्रवास धोक्याचा ठरत आहे. पावसाळ्याच्या दिवसात सर्वाधिक त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो. या पोलिसी वसाहतीत सुमारे ३०० पोलीस कर्मचारी राहतात. त्यांची समस्या लक्षात घेता देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत तात्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे.निवासस्थान ते शौचालयापर्यंतचा रात्रीचा प्रवास धोक्याचाजिल्हा मध्यवती कारागृहासमोरील पोलीस वसाहतीत सुमारे १५ घरातील रहिवाशांसाठी सार्वजनिक पद्धतीची शौचालये तयार करण्यात आली आहे;पण शौचालयांना झुडपांचा विळखा असून त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असल्याने रात्रीचा निवासस्थान ते शौचालय हा प्रवास धोक्याचा ठरत आहे.आज याच संबंधाने नागपुरात बैठक पार पडली. ज्या ठिकाणी ही पोलीस वसाहत आहे. तेथे जुनी घरे तोडून ५०० पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन घरे तयार होणार आहे. शिवाय सेवाग्राम परिसरात ५० घरे तयार होणार आहे.- निर्मलादेवी एस., पोलीस अधीक्षक, वर्धा.