पोलीस वसाहतीचे खस्ताहाल

By Admin | Updated: March 7, 2016 02:02 IST2016-03-07T02:02:23+5:302016-03-07T02:02:23+5:30

खरांगणा पोलीस स्टेशन येथील कर्मचारी वसाहतीतील निवासस्थानांची अवस्था अतिशय जर्जर झालेली आहे.

Police outposts | पोलीस वसाहतीचे खस्ताहाल

पोलीस वसाहतीचे खस्ताहाल

३३ कर्मचाऱ्यांसाठी १३ निवासस्थाने : सहा निवासस्थानांची अवस्था जर्जर
अरविंद काकडे आकोली
खरांगणा पोलीस स्टेशन येथील कर्मचारी वसाहतीतील निवासस्थानांची अवस्था अतिशय जर्जर झालेली आहे. ३३ कर्मचाऱ्यांसाठी अवघी १३ निवासस्थाने असून त्यापैकी सहा निवासस्थाने मोडकळीस आली आहे. तरीही कर्मचारी येथे जीव मुठीत घेऊन राहत असल्याचे वास्तव येथे पाहावयास मिळत आहे.
खरांगणा (मो.) येथील पोलीस स्टेशन क्षेत्रफळाने मोठे आहे. अनेक या स्थानकाशी निगडीत आहेत. येथे ठाणेदार, एक पोलीस उपनिरीक्षक व सहायक उपनिरीक्षक, जमादार, शिपाई असे एकूण ३३ कर्मचारी आहेत. २४ तास कर्तव्य बजावणे गरजेचे असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे कायद्याने बंधनकारक आहे. पण पुरेशी निवासस्थाने येथे नाही.
३३ कर्मचाऱ्यांसाठी अवघी १३ निवासस्थाने असून सहा निवासस्थाने राहण्यायोग्य नसून ती मोडकळीस आली आहे. कर्मचारी जीव मुठीत घेवून येथे राहत आहेत. येथील पोलीस स्टेशनची इमारत ही शंभर ते १२५ वर्ष जुनी असली तरी ती सुस्थितीत आहे. पोलीस वसाहतीतील सहा निवासस्थानांना ९८ वर्ष झाली आहे. निवासस्थानावरील कवेलू फुटले आहे. शौचालयावर छप्पर नाही. दारे मोडकळीस आली आहे. तर सांडपाणी वाहुन जाणारे पाईप फुटले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गाचे काल होत आहे. येथे सुसज्ज वसाहत बांधण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Police outposts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.