पोहणा येथील जिल्हा सीमेवर पोलीस चौकी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:37+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर लढा देत आहे. जिल्ह्यात अद्यप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरी बाहेरगावाहून येणाऱ्यांना शहरात बंदी आहे. पोहणा येथील वर्धा नदीच्या पुलावरून येवती, राळेगाव मार्गावरून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आवागमण सूरू होते.

Police outpost started at the district boundary at Pohna | पोहणा येथील जिल्हा सीमेवर पोलीस चौकी सुरू

पोहणा येथील जिल्हा सीमेवर पोलीस चौकी सुरू

ठळक मुद्देआधार संघटनेच्या पाठपुराव्याला यश

लोकमत न्यूज नेटवर्क
आजनसरा: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहे. परंतु, पोहणा गावाजवळील यवतमाळ जिल्हा सिमेलगतच्या वर्धा नदीच्या पुलावरून नागरिकांचे आवागमण सुरू होते. आधार संघटनेचे तेजस तिघरे यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या आदेशान्वये पोहणा येथील जिल्हा सीमेवर तात्पुरती पोलीस चौकी उभारण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर लढा देत आहे. जिल्ह्यात अद्यप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरी बाहेरगावाहून येणाऱ्यांना शहरात बंदी आहे. पोहणा येथील वर्धा नदीच्या पुलावरून येवती, राळेगाव मार्गावरून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आवागमण सूरू होते.
यवतमाळ जिल्ह्यातील येणाऱ्या नागरिकांमुळे संसर्ग होऊ नये, यासाठी आधार संघटनेचे हिंगणघाट तालुकाध्यक्ष तेजस तिघरे यांनी भास्कर इथापे यांच्याशी संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली. इथापे यांनी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार व पोलीस प्रशासनाशी संपर्क करून पोहणा पुलावरील जिल्हा सीमेवर पोलीस चौकी देण्याबाबत विनंती केली होती.
प्रशासनाने याची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे यांच्या उपस्थितीत तात्पुरत्या स्वरूपाची पोलीस चौकी उभारून जिल्हा सीमा सिल केली.

Web Title: Police outpost started at the district boundary at Pohna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.