गावचा कारभार पोलीस पाटलाविना
By Admin | Updated: July 27, 2014 00:15 IST2014-07-27T00:15:26+5:302014-07-27T00:15:26+5:30
रामदरा (शिर्री) येथे अजूनपर्यंत पोलीस पाटलाचे पद रिक्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोय सोसावी लागत आहे. रामदरा (शिर्री) गावाचे तळेगाव येथे पुनवर्सन होऊन २५ वर्षे झाले. या गावाची सात

गावचा कारभार पोलीस पाटलाविना
तळेगाव (श्या.पंत) : रामदरा (शिर्री) येथे अजूनपर्यंत पोलीस पाटलाचे पद रिक्त आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोय सोसावी लागत आहे.
रामदरा (शिर्री) गावाचे तळेगाव येथे पुनवर्सन होऊन २५ वर्षे झाले. या गावाची सात सदस्याची वेगळी ग्रामपंचायत आहे.या गावाचे पुनवर्सन झाले तेव्हापासून सदर ग्रामपंचायतीत निवडणूक न होता सात सदस्य अविरोध निवडून येतात. पण गावामध्ये अद्याप पोलीस पाटलाची नियुक्ती झाली नाही. विद्यार्थ्यांना शालेय कामकाजासाठी पाहिजे असलेले पोलीस पाटलाचे प्रमाणपत्र मिळेनासे झाले आहे. शिवाय अन्य कामेही खोळंबली आहे.
प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वारंवार मागणी करुनही गावात पोलीस पाटलाच्या नियुक्तीसाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे तळेगावात एकूण तीन पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तीन पोलीस पाटलापैकी एका पोलीस पाटलाचे निधन झाले. तेव्हा पासून ही जागा खालीच आहे. एक पोलीस पाटील चार-पाच वर्षापासून गावात राहत नसल्याने ती जागाही रिक्त आहे.
२० हजार लोकसंख्या ६ वार्डाच्या गावाचा कारभार सध्या एकाच पोलीस पाटलावर आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे कामे खोळंबली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत या जागा त्वरित भराव्या अशी मागणी नागरिक करीत आहे.(वार्ताहर)