पोलीस अधिकाऱ्याला अटकपूर्व जामीन
By Admin | Updated: September 14, 2016 00:42 IST2016-09-14T00:42:17+5:302016-09-14T00:42:17+5:30
समुद्रपूर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल होणाऱ्या मारहाणीच्या गुन्ह्यात फसलेल्या आरोपीची सुटका करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी

पोलीस अधिकाऱ्याला अटकपूर्व जामीन
लाच प्रकरण : न्यायालयाचे एसीबीवर ताशेरे
वर्धा : समुद्रपूर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल होणाऱ्या मारहाणीच्या गुन्ह्यात फसलेल्या आरोपीची सुटका करण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी, ठाणेदार रंजितसिंग चव्हाण यांच्यासह यशवंत कारभोर या तिघांवर हिंगणघाट पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ठाणेदार चव्हाण व कारभोर या दोघांना अटक करण्यात आली होती. तर उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी यांनी अटकपूर्व जामीन मिळविल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली.
सदर प्रकरण न्यायालयात गेले असता न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर येथील चमूवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
न्यायालयाने या प्रकरणात गरज नसताना कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना यात गोवल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. याच मुद्यावर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रकरणात आरोपी म्हणून असलेले ठाणेदार चव्हाण व कारभोर यांची जामीनावर सुटका झाली आहे. याप्रकरणी तपास सुरू असून काय ते समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)