‘त्या’ गावठी बॉम्ब प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूच
By Admin | Updated: January 30, 2016 02:25 IST2016-01-30T02:25:27+5:302016-01-30T02:25:27+5:30
गणतंत्र दिनी नजीकच्या हमदापूर येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाला. ते बॉम्ब या गावात कुठून आले याचा शोध लावण्यात पोलिसांना अद्यापही अपयश आले आहे.

‘त्या’ गावठी बॉम्ब प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूच
सेवाग्राम : गणतंत्र दिनी नजीकच्या हमदापूर येथे गावठी बॉम्बचा स्फोट झाला. ते बॉम्ब या गावात कुठून आले याचा शोध लावण्यात पोलिसांना अद्यापही अपयश आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे.
गणतंत्र्य दिनी बिजवार कॉम्प्लेक्स मधील रस्त्यालगत नाली जवळ चिकू प्रमाणे दिसणारी वस्तू मोरेश्वर बिडकर यांच्या नजरेत आली. ते उचलले असता ते चिकू नसल्याने फेकताच स्फोट झाला. त्यात बिडकर यांना इजा झाली. दहेगाव पोलीस व बॉम्ब निकामी पथकाने कारवाई करीत उर्वरीत बॉम्ब जप्त केले. एकाच ठिकाणी पाच गावठी बॉम्ब आढल्याने खुद्द उपसरपंच संजय देशमुख यांनीच शंका व्यक्त केली. डुकरासाठी आणले असते तर रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी पडले असते पण तसेच झाले नाही. दहेगाव ठाण्याचे ठाणेदार मनीष बन्सोड यांनी या परिसरात डुकरांचा त्रास शेतकऱ्यांना आहे. शेतकरी बंदोबस्तासाठी असे बॉम्ब ठेवतात. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)