पोलीस विभागही घेतोय सोशल मीडियाचा आधार
By Admin | Updated: January 15, 2015 22:55 IST2015-01-15T22:55:59+5:302015-01-15T22:55:59+5:30
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, याकरिता नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोहीम राबविली जाते. यासाठी मिरवणूक काढणे, पत्रक वाटणे, भित्तीपत्रके लावणे या पारंपरिक

पोलीस विभागही घेतोय सोशल मीडियाचा आधार
गौरव देशमुख - वर्धा
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, याकरिता नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोहीम राबविली जाते. यासाठी मिरवणूक काढणे, पत्रक वाटणे, भित्तीपत्रके लावणे या पारंपरिक प्रचारमाध्यमांना फाटा देत पोलिसांनी सोशल मिडियाचा आधार घेतला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून आवश्यक संदेश दिला जातो.
व्हिडीओ, छायाचित्रे, लघुसंदेश या माध्यमातून पोलीस यंत्रणा जागृती करीत आहेत. चोरी व लुबाडणूक टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी याची माहिती दिली जाते. नागरिकांकडून सोशल मिडियाचा वापर अधिका होत असल्याने ही प्रचार पद्धती प्रभावी ठरत असल्याचे दिसते. स्थानिक पोलीस विभागानेही याची दखल घेत प्रणाली विकसीत केली आहे. याच अनुषंगाने सद्यस्थितीत अमरावती व कोल्हापूर विभागाद्वारे प्रसारीत केले जाणारे व्हिडीओ, इमेजेस वर्धा विभागाच्या माध्यमातून जनहितार्थ प्रसारीत केल्या जात आहेत. यात बेवारस वस्तु दिसल्यास पोलिसांना कसे कळवावे, सोन्याची साखळी किंवा मंगळसुत्र चोरी कशी होत, चोरट्यांनी लढवलेल्या शक्कल, सूचना आदींची माहिती असते. वर्धा विभागाकडून विविध सूचना सोशल मिडियावर अपलोड केले जातात.