शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
6
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
7
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
8
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
9
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
10
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
11
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
12
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
13
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
14
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
15
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
16
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
17
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
18
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
19
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
20
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला

पोलीस कोमात अन् चोरटे जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.

ठळक मुद्देआंजी (मोठी), वायगाव (निपानी.), तळेगाव (श्या.पं.) मध्ये धाडसी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नजीकच्या वायगाव (नि.) येथील पाच दुकानांचे कुलूप तोडून तर आंजी (मोठी) येथे एका कुलूपबंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. इतकेच नव्हे तर चोरट्यांनी तळेगाव (श्या.पं.) नजीकच्या बहादरपूर शिवारातून कापूस चोरून नेला. या तिन्ही घटना मागील २४ तासांत घडल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय परिसरात चोरट्यांबाबतची दहशत निर्माण झाली आहे.आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.शेतातून परतल्यावर घराचे कुलूप उघडे दिसल्याने खेडकर यांनी घरात प्रवेश करून बारकाईने पाहणी केली असता चोरीचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती खरांगणा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच आंजी (मोठी) पोलीस चौकीचे प्रभारी संतोष कामडी आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. तर दुसरी घटना तळेगांव (शा.पं.) नजीकच्या बहादरपूर शिवारात घडली. अज्ञात चोरट्यांनी रविंद्र रमेश टर्के यांच्या शेतात प्रवेश करून शेतातील वेचणी करुन ठेवलेला सुमारे ८० किलो कापूस चोरून नेला. यामुळे शेतकरी टर्के यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकरी रविंद्र टर्के यांच्या तक्रारीवरून तळेगांव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.पाच दुकाने फोडलीवायगाव (नि.) : येथील पाच दुकानाचे कुलूप रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रफुल झोटिंग, श्रीकांत पाल, दिलीप वांदाड यांच्या दुकानातून चोरट्यांनी मुद्देमाल पळविला. तर मेहबूब पान सेंटर आणि बछु भाई हॉटेल या दुकानातून खाद्य पदार्थांसह रोख रक्कम चोरून नेली. एकाच रात्री पाच दुकाने फोडल्याने गावात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. चोरीची माहिती मिळताच वायगाव पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Thiefचोर